vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी हे शिबिर महत्त्वाचे* *- ए.एस. राजंदेकर*

*सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी हे शिबिर महत्त्वाचे* *- ए.एस. राजंदेकर*

 

रायगड प्रतिनिधी- विधी सेवा समितीच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येत असतात. विधी सेवा समितीकडून अनेक बाबतीत मोफत कायदेविषयक सेवा पुरविली जाते. विधी सेवा समितीच्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी तसेच सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी यासाठी हे शिबिर महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष ए.एस. राजंदेकर यांनी रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या बालगंधर्व रंगभवन सभागृहात रविवारी (दि.१९) संपन्न झालेल्या विधी सेवा महशिबिर, शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्यात केले.

 यावेळी त्यांनी जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून राबविले जाणारे विविध उपक्रम व सेवांची माहिती उपस्थितांना दिली.

या शिबिरास रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अलिबाग बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, जिल्ह्यातील न्यायालयांतील न्यायाधिश, शासनाच्या विविध खात्याचे अधिकारी, जिल्हा व जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समिती मधील वकील वर्ग, अनेक मान्यवर, शासकीय कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, उच्चशिक्षित व्यक्तींनाही कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा समितीने भविष्यात शाळेय स्तरावर कायद्याची तोंड ओळख देणारे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत असे मत व्यक्त केले. याचवेळी त्यांनी महसूल खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या विविध महत्त्वकांक्षी योजनांची सखोल माहिती दिली.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बाष्टेवाड यांनी आपल्या मनोगतात सामान्य प्रशासनाच्या विविध प्रकारच्या कर वसुलीमध्ये लोक अदालतीचा होणारा उपयोग सांगितला. तसेच त्यांच्या प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामीण भागातील सुमारे साडे अठरा हजार बचत गटांचे कार्य तसेच इतर बाबतीत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली.

या महामेळाव्यात शासनाच्या विविध खात्यांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे २० स्टॉल लावण्यात आले होते. याच कार्यक्रमात शासनाच्या विविध खात्यांमधील लाभार्थ्यांना धनादेश तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव अमोल शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन रोहा कनिष्ठ स्तर न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश सुनील महाले यांनी केले. या विधी सेवा शिबिर,शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्यासाठी रिलायन्स कंपनीचे सहकार्य मिळाले.

000

संबंधित पोस्ट

पालकांच्या कृतीशिलतेतून पाल्यांमध्ये वाचन संस्कृती रूजेल – बालसाहित्यिक प्रशांत वि. गौतम

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गतमौजे नाटोलीत प्रकल्पाचे भूमिपूजन- चौदा एकरावर ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प…

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला समाज कल्याण मंत्रालयाच्या योजनांचा आढावा*

vishwatmaklokswamivarta

बारामती तालुक्यात अतिवृष्टीमुळे काटेवाडी परिसरातून ७ आणि शहरातून १ अशा ८ नागरिकांची सुखरूप सुटका. नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर. 

मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सची उद्या व्यापार परिषद२८ वा वर्धापन दिननिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन…

vishwatmaklokswamivarta