vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे-शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

*प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे-शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा- पालकमंत्री शंभूराज देसाई*

सातारा, प्रतिनिधी : यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखादार साजरा व्हावा. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या सारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर दर्शविण्यात यावी. प्रजासत्ताकदिनी चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभातील संचलनाबरोबर शहरातही फिरवावेत. यासाठी प्रशासकीय विभागाने समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील , पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमाची सर्व प्रथम सातारा जिल्ह्यात सुरुवात करून या उपक्रमांतर्गत २९ हजार नागरिकांना थेट लाभ देण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत एकट्या सातारा जिल्ह्यात 8 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देऊन सातारा जिल्ह्यात उत्तम कामकाज करण्यात आले आहे. 26 जाणे ला या दोन्ही योजनांवर आधारित चित्ररथ तयार करावा. या चित्ररथावर तालुकानिहाय लाभार्थ्यांची ठळक आकडेवारी द्यावी. तसेच मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट सुरु झाले आहे त्याचे फोटो असणाराही चित्ररथ तयार करावा. कृषी व जिल्हा परिषदेनेही आपल्या विभागाशी संबंधित बांबू रोपण व इतर महत्वाच्या विषयाशी संबंधित चित्ररथ तयार करावेत. या चित्ररथांचे प्रजासत्ताकदिनी संचलन झाल्यानंतर हे चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी शहरात देखील फिरवावे. शासकीय इमारतींसह शिवतिर्थ, राजवाडा अशा महत्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करावे. शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. यापुढेही अशाच पद्धतीने काम करा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ कार्यक्रम जनजागृती उपक्रमाच्या अंमलबजावणीचा लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घेतला आढावा* लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये मंगळावर, बुधवारी प्रभात फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ग्लोबल चित्रपट निर्मितीसाठी ‘इंडिया सिने हब पोर्टल’चा वापर करण्याचा केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह; दुर्लक्षित भागात कमी खर्चातील चित्रपटगृहांच्या विकासासाठी रोडमॅपही सादर

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन 

अनाधिकृत नळ शोध मोहिमेंतर्गत लोक अदालतीचे आयोजन”लोकअदालतीमध्‍ये अनाधिकृत नळ धारकांनी रु. 10,000/- ऐवजी रु. 7500/- शुल्‍क भरणा करावा.- आशिमा मित्‍तल, भा.प्र.से. जिल्‍हाधिकारी तथा आयुक्‍त

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास,सुधारित प्रस्ताव सादर करावाकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश१४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम वितरित करण्याबाबत,कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती केली

vishwatmaklokswamivarta