vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास,सुधारित प्रस्ताव सादर करावाकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश१४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम वितरित करण्याबाबत,कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती केली

ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास,सुधारित प्रस्ताव सादर करावाकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश१४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम वितरित करण्याबाबत,कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती केली

 

नवी दिल्ली प्रतिनिधी : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत सन २०२२-२३ पासून राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमणार, केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सह सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली असून आत्तापर्यंत राज्यातील २५७ पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी ११६ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी किंमतीच्या ४०% अथवा कमाल रु. ३५ लाख अनुदान देण्यात येते.

उर्वरित १४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम त्वरित वितरित करण्याबाबत कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बैठकीत विनंती केली.

या योजनेचा राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजुरांच्या संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनेत सुधारणा करून सुधारित प्रस्ताव केंद्र शासनास त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांनी निर्देश दिले. या सुधारित प्रस्तावास केंद्र शासनाची त्वरित मान्यता देण्यात येईल असे श्री गडकरी यांनी स्पष्ट केले

****

संबंधित पोस्ट

फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे· फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

विद्यार्थ्यांची अपार आयडी आणि डिजीलॉकर नोंदणी पूर्ण करण्याचे उच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश जून २०२६ पर्यंत क्रेडिट डेटा अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर ११ मार्च २०२६ रोजी धडक मोर्चा….

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्विकारण्यास 15 मार्च पर्यंत मुदतवाढ.