vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर ११ मार्च २०२६ रोजी धडक मोर्चा….

रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर ११ मार्च २०२६ रोजी धडक मोर्चा….

— राज्य प्रतिनिधी-(नागपूर) महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पातील एकूण निधी पैकी अनुसूचित जाती करीता १५ टक्के निधी ठेवण्याच्या २१ जून १९७९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अनुसूचित जातीचा अर्थसंकल्पातील निधी इतरत्र कुठेही वळवू नये यासाठी कायदा करावा, अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना (फ्रि शिप), शिष्यवृत्ती योजना (स्कौलरशिप),फेलोशिप,परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजना, शासकीय नोकरीतील अनुसूचित जाती जमातींचा अनुशेष भरून काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणे, कंत्राटी पद्धतीने कामगारांच्या भरतीमध्ये आरक्षण धोरण लागू करणे, खाजगी क्षेत्रात आरक्षण धोरण लागू करणे, अनुसूचित जाती जमातींच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, तसेच ज्या माजी आमदार, खासदार यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांची पेन्शन बंद करावी त्यांना क्रिमिलेयर लावण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या (खोरिपा) वतीने राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मुंबई येथे दि ११ मार्च २०२६ रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे ( खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष मा देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांनी केली आहे शनिवार दि १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२-३० वा आमदार निवास, नागपूर येथे संपन्न झालेल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांनी ही घोषणा केली आहे ह्या बैठकीत नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला त्यानंतर समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला

तसेच येत्या १८ मार्च २०२६ रोजी रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जिल्ह्यात एकाच वेळी समारंभ आयोजित करून सभासद नोंदणी मोहीमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे

  बैठकीत रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी एड दिपांकर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे ह्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राचार्य डॉ गोपीचंद मेश्राम, डॉ शिवशंकर बनकर, सरचिटणीस उत्तमराव गवई, प्रवक्ते डॉ एन व्हि ढोके,प्रशिक आनंद, प्रेम गजभिये,संघटक सचिव पुरूषोत्तम शेंडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे, उपाध्यक्ष सी एम रामटेके, सचिव प्रा अशोक ढोले,विधी सल्लागार एड मोहन कोरडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी पी रामटेके, पश्चिम विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुरेश दहिकर,राजूभाऊ गजभिये, दिगंबर वाकोडे, नागपूर प्रदेश अध्यक्ष डॉ विनायक गणवीर, चंद्रपूर शहर अध्यक्ष मुन्नाभाऊ खोब्रागडे, वर्धा जिल्हा अध्यक्ष विनायकराव ताकसांडे , सिद्धार्थ रामटेके,रवीभाऊ सातदिवे, आनंद वानखेडे,अजय बोरकर, सुदर्शन मून, सुदेश शेंडे,शाहिर ललकार बाबू, सुनिल गवळी आदी मान्यवर उपस्थित होते

000000

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन

थंडी आणि अंधारापूर्वीच मतदानाचा हक्क बजावावा;ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिकारी अशीमा मित्तल यांचे आवाहन• हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन• 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 कालावधीत होणार मतदान• मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगाम 2025-26 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन1 ते 7 डिसेंबर – 10 वा “पीक विमा सप्ताह”गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा.- माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह