vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिवाळी व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ४ कोटी २१ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त..

दिवाळी व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ४ कोटी २१ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त..

राज्य प्रतिनिधी-मिसब्रँडेड व निकृष्ट दर्जाचा संशय असलेल्या अन्नपदार्थांवर कारवाई; अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपीच्या आस्थापनावर धाड..

 दिवाळी व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत M/s. Ajfan International Retails LLP या आस्थापनातील विविध अन्नपदार्थांचा एकूण ₹४,२१,०६,९६१ (४ कोटी २१ लाख ६ हजार ९६१ रुपये) किमतीचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्नपदार्थ मिसब्रँडेड असल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली.

सदर आस्थापना प्लॉट क्रमांक १०१ व ११३, जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, कामोठे, पनवेल, जिल्हा रायगड येथे स्थित आहे. या कारवाईदरम्यान श्री. कृष्णउन्नी ई. जी. मेनन (ॲडमिन मॅनेजर व व्हेंडर) यांच्याशी संबंधित आस्थापनातील अन्नसाठ्याची तपासणी करण्यात आली.

अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई,सदर प्रकरणात अन्नपदार्थांच्या लेबलिंग व गुणवत्तेबाबत आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २३, २६ व २७ अंतर्गत तरतुदींच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. संबंधित अन्नपदार्थ मिसब्रँडेड असल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यात येत आहे

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई,ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) श्री. ए. ए. मैत्रे आणि श्री. एम. आर. महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहआयुक्त (अन्न) श्री. सचिन जाधव यांच्या प्रशासकीय देखरेखीखाली अन्न सुरक्षा विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती पी. ए. भंडारकर यांच्यासह श्री. यू. एस. बडे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, कोकण विभाग), श्री. जी. एम. साबळे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, मुख्यालय), श्रीमती पावसकर, श्री. आढाव, श्री. इघारे, श्री. माने, श्रीमती गावडे आणि श्रीमती मुलानी यांनी सहभाग घेतला.

सदर प्रकरणात श्रीमती प्रिती टिपरे, सह आयुक्त (दक्षता) व सचिन जाधव, सह आयुक्त (कोकण विभाग) ठाणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

दिवाळी व सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

आज गुरुवार, ३ सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्या मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात शिवसेना ठाण्यात करणार ट्रेनचे जंगी स्वागत   खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश  

vishwatmaklokswamivarta

मेळघाटाच्या डोंगरदऱ्यांत रंगला जिल्हा प्रशासनाचा ‘ट्रेकिंग’ अनुभव*ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; २६९६ कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू व साहसी उपक्रमांतील व्यक्तींना आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तींनी स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अकारी निवडीसाठी31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन