vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू व साहसी उपक्रमांतील व्यक्तींना आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू व साहसी उपक्रमांतील व्यक्तींना आवाहन

रायगड-अलिबाग द प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडू व व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटे ५९ सेकंदांपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

शासनाच्या २९ डिसेंबर २०२३ आणि २५ जानेवारी २०२४ रोजीच्या निर्णयांनुसार निश्चित करण्यात आलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली, २०२३ नुसार ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

पुरस्कारासाठी इच्छुकांनी https://sports.maharashtra.gov.in या क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. निर्धारित मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने पात्र इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले • समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न …

केंद्रीय गृह मंत्रालयानं बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ला दहशतवादी संघटना घोषित  केले

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी-केरळचे माजी मुख्यमंत्री पी.विजयन यांच्या निवासस्थानासह संबंधीत १२ ठिकाणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे छापे सुरु…..

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा*

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

शिवसेनेचे खरे नेतृत्व एकनाथ शिंदेच करीत असल्याची जनभावना – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

vishwatmaklokswamivarta