vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस परिवहन विभागाचे अधिकारी यांनाही बोलवण्यात येईल असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणल्या, मुंबईची लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेता शहरात किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. यासाठी बेस्टने विविध कंत्राटदारांना ६,५५५ बस पुरवठ्यासाठी वर्क ऑर्डर दिल्या होत्या. मात्र कंत्राटदारांकडून बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने अपेक्षित प्रमाणात बससेवा वाढवता आली नाही. मार्च २०२३ पर्यंत १,३०० बस उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र सध्या केवळ ६८५ बस उपलब्ध झाल्या आहेत.

स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार १५ वर्षांनंतर बस स्क्रॅप केल्या जात असल्याने बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या कमी झाली आहे. पूर्वी बेस्टकडे १,८८२ मालकीच्या बस होत्या, मात्र सध्या ही संख्या २४९ इतकी राहिली आहे. उर्वरित बस भाडेतत्त्वावर घेतल्या असून सध्या २,५५८ भाडेतत्त्वावरील बस उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१सरपंचांचा सक्रीय सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

घोटाळेबाजांची एसआयटीमार्फत चौकशी करावी-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवारी धरणे / निदर्शने आंदोलन

रणजित मोहन यादव यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून-डीप क्लिनींगव्दारे हवा गुणवत्ता सुधारणेवर भर…

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहायक

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

vishwatmaklokswamivarta