vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-· भारतीय क्रिकेट संघाचे ऐतिहासिक विजयाबद्दल विधान परिषदेत अभिनंदन· भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने क्रिकेट जगतात देशाचा अलौकिक गौरव

भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने देशभरात जल्लोष- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-· भारतीय क्रिकेट संघाचे ऐतिहासिक विजयाबद्दल विधान परिषदेत अभिनंदन· भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाने क्रिकेट जगतात देशाचा अलौकिक गौरव

मुंबई, प्रतिनिधी -टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अहमदाबाद येथे भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळविल्यामुळे देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाने क्रिकेट विश्वात भारताचा गौरव उंचावला आहे. भारतीय संघाने दाखवलेल्या जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट सांघिक खेळामुळे पुन्हा एकदा क्रिकेट जगतात देशाचा अलौकिक गौरव झाला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ते बोलत होते.या देदिप्यमान यशाबद्दल भारतीय क्रिकेट संघ, प्रशिक्षक मंडळ तसेच बीसीसीआयचे चेअरमन जय शाह यांचे राज्यशासन आणि राज्यातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करत भारतीय संघाची विजयी पताका अशीच उंचावत राहो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला. या विजयासह सलग दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून भारताने २००७, २०२४ आणि २०२६ अशा तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला आहे. हा केवळ क्रिकेटमधील विजय नसून भारतीय खेळाडूंच्या जिद्दीचा, संघभावनेचा आणि विश्वासाचा प्रतीक असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार सूर्यकुमार यादव, फलंदाज संजू सॅम्सन, तसेच गोलंदाज जसप्रीत बूमरा यांच्यासह संपूर्ण संघाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत न्यूझीलंडला पराभूत केले, तर संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबतची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द…

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात 19 मार्च रोजी ‘यलो अलर्ट’ नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणूक-2026 मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी..

vishwatmaklokswamivarta

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्य16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीदिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री..

पायाभूत सोई सुविधांनी समृद्ध महाराष्ट्र निर्माण करणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले