vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग-धोकादायक इमारतींविषयी जाहीर आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग-धोकादायक इमारतींविषयी जाहीर आवाहन

नवी मुंबई प्रतिनिधी-नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग-धोकादायक इमारतींविषयी जाहीर आवाहन

          सोबत जोडलेल्या यादीतील इमारतींमध्ये वास्तव्य करणारे मालक / भोगवटादार किंवा इतर यांना असे कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांचेकडील दि.05.11.2015 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, आपण राहत असलेली इमारत निवासी / वाणिज्य वापराकरिता धोकादायक असल्याबाबत तसेच या इमारतीमधील निवासी / वाणिज्य वापर तात्काळ थांबवावा व धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकणेबाबत आपणांस लेखी सूचना / नोटीस देण्यात आलेल्या आहेत.

          सी-1 प्रवर्गातील इमारतीची विदयुत व जल जोडणी खंडीत करण्यात येईल असे वेळोवेळी वर्तमानपत्राव्दारे जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे. आपण रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जिवीत व वित्तहानी होण्याचा संभव आहे. सदर इमारतीचा / बांधकामाचा निवासी / वाणिज्य वापर त्वरित बंद करून सदरची इमारत / बांधकाम त्वरित विनाविलंब तोडून टाकावे, अशी कार्यवाही न केल्यास इमारत / बांधकाम कोसळल्यास होणा-या नुकसानीस फक्त आपणच जबाबदार राहाल. यास नवी मुंबई महानगरपालिका जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

अतिधोकादायक सी-1 इमारती : सन- 2026-27 यादी इमेज मध्ये जोडलेली आहे.

संबंधित पोस्ट

मतदारांची माहिती संकलित करण्यासाठी घरी येणा-या बीएलओ यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन

यशकथा-बँक सखी ते लखपती दीदींची आधारस्तंभ: कावेरी जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास

वर्ल्ड लीडरशिप फोरमतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी….

vishwatmaklokswamivarta

गुरुवारी २२ जानेवारी २६ ला गणेश जयंती आहे त्यानिमित्ताने …….*

vishwatmaklokswamivarta

बारामती तालुक्यात अतिवृष्टीमुळे काटेवाडी परिसरातून ७ आणि शहरातून १ अशा ८ नागरिकांची सुखरूप सुटका. नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर. 

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन