vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वाशिम वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘संत सेवालाल महाराज’ नामकरण

वाशिम वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘संत सेवालाल महाराज’ नामकरण

मुंबई, प्रतिनिधी: संत सेवालाल महाराज जयंतीच्या औचित्याने राज्य शासनाने वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण ‘संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम’ असे करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १३ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील हे महाविद्यालय १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे असून त्यास ४३० खाटांचे संलग्नित रुग्णालय आहे. वाशिम जिल्हा तसेच आसपासच्या ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना दुय्यम व तृतीयस्तरीय आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतानाच आधुनिक आरोग्यसेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे कार्य येथे सुरू आहे.

महाविद्यालयाच्या नामांतराबाबत लोकप्रतिनिधीकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि महान समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सेवालाल महाराजांनी सामाजिक समता, नैतिक जीवन, व्यसनमुक्ती, परिश्रम व स्वाभिमानाचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय विशेष औचित्यपूर्ण मानला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या नामांतरास मान्यता दिली. नामांतरानंतर आवश्यक बदल संकेतस्थळे, अभिलेखे व अधिकृत नोंदींमध्ये करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.

या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाला सामाजिक मूल्यांची जोड मिळणार असून संतांच्या विचारांचा प्रसार नव्या पिढीपर्यंत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

०००

संबंधित पोस्ट

पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास शासनाची मान्यता- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधितांना विशेष मदत पॅकेज, सवलती लागू बुलढाणा जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश  शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तरे :पुणे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गुन्हेगारीत सहभागी विधी संघर्षित बालकांसाठी दिशा कार्यक्रम…

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधीn- सरन्यायाधीश भूषण गवई मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव.

पाणी फॉउंडेशन फार्मर कप 2026 जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta