vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात पाच दिवसीय 6154 श्रीगणेशमूर्तींचे सुव्यवस्थित विसर्जन-मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करीत कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनाला प्राधान्य सुयोग्य विसर्जन व्यवस्थेबद्दल नागरिकांकडून समाधान

‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात पाच दिवसीय 6154 श्रीगणेशमूर्तींचे सुव्यवस्थित विसर्जन-मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करीत कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनाला प्राधान्य सुयोग्य विसर्जन व्यवस्थेबद्दल नागरिकांकडून समाधान

 

     नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘पर्यावरणशील प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव 2026’ साजरा करण्याबाबत नवी मुंबईकरांना करण्यात आलेल्या आवाहनास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फूटापर्यंतच्या सर्व श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरण जपणुकीकरिता कृत्रिम तलावातच करावे या आवाहनासही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. महानगरपालिकेने ठिकठिकाणी 156 इतक्या मोठ्या संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये नागरिकांनी श्रीमूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाचव्या विसर्जन दिवशी 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे व 11 (14 गावे) नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच 156 कृत्रिम विसर्जन स्थळे अशा एकूण 189 विसर्जन स्थळांवर एकूण 6154 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले.

          यामध्ये बेलापूर विभागात 5 नैसर्गिक व 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1084 घरगुती व 25 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

          नेरुळ विभागात 2 नैसर्गिक व 24 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 731 घरगुती व 5 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले.

          वाशी विभागात 2 नैसर्गिक व 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 593 घरगुती व 10 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

          तुर्भे विभागात 3 नैसर्गिक व 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 658 घरगुती तसेच 07 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

          कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक व 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 991 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.  घणसोली विभागात 4 नैसर्गिक व 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1005 घरगुती व 01 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

ऐरोली विभागात 3 नैसर्गिक व 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 787 घरगुती व 3 सार्वजनिक मंडळाच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले.   दिघा विभागात 1 नैसर्गिक व 10 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 248 घरगुती व 5 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. दिघा विभागांतर्गत 14 गावांमध्ये घरगुती 01 गणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

          अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 189 विसर्जन स्थळांवर पाच दिवसीय 6154 श्रीगणेशमूर्तींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला. यामध्ये शाडू मातीच्या 1444 श्रीमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

          शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन पर्यावरणशील दृष्टीकोन जपणा-या नागरिकांना ‘पर्यावरण मित्र’ म्हणून महापौर श्रीम.सुजाता पाटील व प्रमुख पदाधिकारी आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र आणि ‘प्लास्टिक पिशव्यांना नकार व कागदी पिशवीचा स्विकार’ असा संदेश प्रसारित करणा-या आकर्षक कागदी पिशव्या प्रदान करुन सर्व विसर्जन स्थळांवर सन्मानित करण्यात आले.

          आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे यांच्यासह परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अमोल पालवे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली आठही विभाग कार्यालयांमार्फत संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड आणि सर्व कार्यकारी अभियंता व त्यांचे सहकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून श्रीमूर्ती विसर्जनासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक विसर्जन स्थळांवर तत्परतेने कार्यरत होते. विसर्जनासाठी महानगरपालिकेने केलेल्या कृत्रिम तलावांच्या व्यवस्थेसह विसर्जन स्थळावरील सुविधांबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

          22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 6 फूटापेक्षा मोठया आकाराच्या श्रीमूर्ती विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था तसेच अनुभवी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित भाविकांना महत्वाच्या सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकासह व्यासपीठ व्यवस्था करण्यात आलेली होती.

          मा.न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे असे आवाहन नागरिकांना सातत्याने करण्यात येत होते. कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे महत्व नागरिकांना पटवून दिले जात होते. त्यास अनुसरुन नागरिकांनी व मंडळांनी आपल्या 6 फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्ती कृत्रिम विसर्जन स्थळावरच विसर्जन करण्यास प्राधान्य दिले.

         सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था ठेवण्यात आली होती. नागरी आरोग्य केंद्रामार्फत त्याठिकाणी वैद्यकीय पथके तैनात होती. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्थाही कार्यरत होती.

          सर्व विसर्जन स्थळांवर ओले व सुके निर्माल्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कलशांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच ते स्वतंत्रपणे वाहून नेण्यासाठी वाहन व्यवस्थाही करण्यात आली होती. भाविकांनी निर्माल्य जलाशयात न टाकता ते निर्माल्य कलशात ठेवावे असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते. संकलित निर्माल्य तुर्भे येथील प्रकल्प स्थळी नेण्यात येऊन त्याचे पावित्र्य राखत सुयोग्य विल्हेवाट लावली जात आहे. नवी मुंबई पोलीस विभाग आणि वाहतुक पोलीस विभागानेही कायदा, सुव्यवस्था व वाहतूक नियोजनाचे काम दक्षतेने व तत्परतेने केले.

          नवी मुंबईकर नागरिकांनी मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान राखून 6 फूटापर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन महानगरपालिकेने मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळावर करण्यास प्राधान्य दिले असून आपला पर्यावरणशील दृष्टीकोन प्रदर्शित केला आहे त्याबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त करीत गणपतीसह गौरी विसर्जन दिनीही नागरिकांनी कृत्रिम विसर्जन तलावांचाच वापर करुन संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

0000

संबंधित पोस्ट

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध स्पर्धेला गोरेगाव येथे दमदार सुरुवात

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाचे ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर..

एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,अनधिकृत पाणी उपसा केल्यास वीजपुरवठा खंडित करा,पाणीसाठा आरक्षण व कृषी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई-विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

शिक्षणाधिकार्‍यांच्या हस्ते विद्यार्थिनीचा गुणगौरव