vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

श्रीगणेश राज्य महोत्सवांतर्गत 22 सप्टेंबरला नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सलील कुलकर्णी यांचा ‘हे गजवदन..’

श्रीगणेश राज्य महोत्सवांतर्गत 22 सप्टेंबरला नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सलील कुलकर्णी यांचा ‘हे गजवदन..’

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्राच्या वैभवशाली गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा नामांकनासाठी ऐतिहासिक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शासन निर्णयानुसार गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर करण्यात आले आहे.

          त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्याच्या दृष्टीने ‘कलागणेश महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

          64 कलांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या श्रीगणरायाचा उत्सव हा कला व संस्कृतीने संपन्न असावा, या दृष्टीने मंगळवार, दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी, सायं. 4.00 वा. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे ‘हे गजवदन..’ हा सुप्रसिध्द संगीतकार, गायक डॉ.सलील कुलकर्णी यांचा विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या गायन स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची विजेती गायिका श्रीम. सन्मिता धापटे-शिंदे त्यांच्या समवेत गणेशगीते सादर करणार आहेत. सर्व वयोगटातील गान रसिकांना तल्लीन करणारा श्रीगणेशाच्या भक्तीगीतांचा हा सुरेल व भावस्पर्शी संगीत नवी मुंबईकरांसाठी एक सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.

          तसेच या महोत्सवामध्ये ‘अक्षर गणेश’ हे अभिनव कलाकृतीचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन लावले जाणार आहेत. विविध कलाविष्कारांमधून श्रीगणरायाची आराधना करणाऱ्या या विशेष कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.

           नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबई क्षेत्रातील विविध क्षेत्रात कार्यरत संस्था, मान्यवर व्यक्ती व नागरिक यांच्याशी सुसंवाद वाढीवर भर देण्यात येत असून हा कार्यक्रम त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

            मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी, विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सायं. 4.०० वाजता आयोजित ‘हे गजवदन…’ या भक्तीगीतांच्या संगीतमय कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीगणेश भक्तीचा आणि सुरेल संगीताचा आनंद घ्यावा, असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता सुरज पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ऑस्कर’ अकॅडमी पुरस्काराने गौरविलेल्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथैय्या यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यासाठी ‘भानू अथैय्या : साधनेतून सन्मानाकडे’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहील!

vishwatmaklokswamivarta

कला व संस्कृतीमुळेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास टिकेल: डॉ.अशोक उईकेभगवान बिरसा कला मंच व कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्‍या विभागीय फेरीचे बक्षिस वितरण  

vishwatmaklokswamivarta

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित  ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ‘राजा शिवाजी’सिनेमाचं वादळ, मोडले कमाईचे रेकॉर्ड्स!

vishwatmaklokswamivarta