vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण 22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण 22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार

 

नांदेड( प्रतिनिधी नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सन 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दि. 11 सप्टेंबर 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 17 सरपंच पदे, तर खुल्या प्रवर्गासाठी 37 सरपंच पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. यापैकी एकूण 28 सरपंच पदे महिलांसाठी राखीव असतील. नागरिकांचा मागास प्रवर्गातील 9 आणि खुल्या प्रवर्गातील 19 पदे महिलांसाठी राखीव राहतील.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सरपंच पदांच्या आरक्षणात बदल होत नसल्याने, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांचे आरक्षण निश्चित करण्याचे आदेश तहसीलदार, नांदेड यांना देण्यात आले होते. त्यानुसार ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील सरपंच पदांचे आरक्षण सोडत पद्धतीने मंगळवार, दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय, नांदेड येथील मा. उपविभागीय अधिकारी, नांदेड यांच्या बैठक कक्षात (दुसरा मजला) निश्चित करण्यात येणार आहे.

हे आरक्षण सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी लागू राहणार आहे. या सोडतीसाठी सर्व संबंधित तसेच माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी निर्धारित दिनांक व वेळेस तहसील कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार, नांदेड यांनी केले आहे.

***

संबंधित पोस्ट

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्ष**24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर; २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद

ज्येष्ठ पत्रकार श्री. अभय मोकाशी यांचे निधन

घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक-फौजदारी कारवाई कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना  …

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलीस कुटूंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ*मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम*