vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या कारवाई सुरूच

मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या कारवाई सुरूच

मुंबई प्रतिनिधी –

मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

🔹या अंतर्गत एफ दक्षिण, एफ उत्तर व जी उत्तर विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील विविध परिसरांची महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी आज अचानक पाहणी केली. विशेषतः दादर परिसरास भेट देऊन अनधिकृत फेरीवाला मुक्त मोहीम तसेच अनधिकृत बांधकामांच्या निष्कासन कारवाईचा सविस्तर आढावा घेतला.

🔹पाहणीदरम्यान श्री. गगराणी यांनी स्थानिक व्यापारी – व्‍यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचनांची नोंद घेतली. या मोहिमेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत अनधिकृत फेरीवाला मुक्त रस्ते व पदपथ धोरणास सकारात्मक प्रतिसाद दिला, तसेच सुव्यवस्था व वाहतूक सुरळीततेसाठी ही कारवाई उपयुक्त ठरत असल्याची भावना व्यक्त केली.

🔹अनधिकृत फेरीवाला / अतिक्रमण निर्मुलन मोहीम केवळ दंडात्मक स्वरूपाची नसून नागरी सुव्यवस्था राखणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि पादचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे या व्यापक उद्देशाने राबवण्यात येत आहे. या मोहिमेसाठी मुंबईकर नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सक्रियपणे साथ द्यावी, असे आवाहन श्री. गगराणी यांनी केले. अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांबाबत माननीय न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन केले जाईल आणि अतिक्रमणविरोधी कारवाई कठोर केली जाईल, असेदेखील श्री. गगराणी यांनी नमूद केले.

🔹उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (विशेष) (अतिरिक्‍त कार्यभार) श्री. विनायक विसपुते यांच्यासह संबंधित विभागांचे सहायक आयुक्त, अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* *मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत 

पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी प्रवेशासाठी 10 ऑगस्टची मुदत..

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta