vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत 

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

जालना प्रतिनिधी:- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. 30 सप्टेंबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 12 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर्षीची दि. 1 सप्टेंबर 2025 पासून वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

-*-*-*-

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील अभोडा झरी गावासाठी टँकर मंजूर

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती 

ऊस तोड कामगारांच्या योजनांविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री

प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष शिबिरांचा लाभ घ्या**सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बीएलओ राहणार उपस्थित**नवमतदारांसह पात्र नागरिकांना नाव नोंदणी, दुरुस्ती व वगळणीची संधी*

vishwatmaklokswamivarta