vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी प्रवेशासाठी 10 ऑगस्टची मुदत..

पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी प्रवेशासाठी 10 ऑगस्टची मुदत..

सांगली, प्रतिनिधी : शिक्षण मंत्रालय, भारत सरकार द्वारा चालविल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय पलूस या निवासी विद्यालयामध्ये इयत्ता 11 वी विज्ञान व कला (सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम) शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधील रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे, असे जवाहर नवोदय विद्यालय पलूसचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

पात्रता – विद्यार्थी हा वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १० वी सांगली जिल्ह्यातील मान्यताप्राप्त सी. बी. एस. ई. बोर्ड अथवा महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ संलग्न विद्यालयातून उत्तीर्ण असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 1 जून 2008 ते 31 जुलै 2010 मधील असावा. विज्ञान शाखेसाठी इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेत व विज्ञान आणि गणित विषयात कमीत कमी कमीत कमी 60 टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. कला शाखेसाठी इयत्ता 10 वी च्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कला शाखेसाठी इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास हे विषय हिंदी माध्यमातून शिकवले जातील.

 निवड निकष – सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम घेऊन १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. शिल्लक राहिलेल्या रिक्त जागा महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ संलग्न विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता यादीप्रमाणे भरल्या जातील.अर्ज कसा करावा – पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन लिंकद्वारे अर्ज भरावा. Website – https://navodaya.gov.in/nvs/nvs-school/Sangli/en/home/ Link – https://forms.gle/uTVn7zDrnpg5DGJV8 किंवा www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा व तो पूर्ण भरून विद्यालयात दि. 10 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावा किंवा पूर्ण भरलेला अर्ज PDF File च्या रुपात jnvpsangli@gmail.com या मेलवर पाठवावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य 

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहिमेंतर्गत माहिती घेण्यासाठी घरोघरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

ग्रंथांच्या यादीसंदर्भात सूचना, हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदवण्याचे आवाहन

स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कायदा व सुव्यवस्था बैठक संपन्न…

vishwatmaklokswamivarta