vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

तळबीड येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली पीक पाहणी

तळबीड येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली पीक पाहणी

सातारा प्रतिनिधी :- कराड तालुक्यातील मौजे तळबीड येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणीचे प्रात्यक्षिक घेत पाहणी केली. डिजिटल प्रणालीद्वारे पीक पाहणी कशी करावी आणि नोंदणी करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या पाहणी दरम्यान कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे आणि तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

प्रशासनाकडून पीक पाहणी मोहिमेची अंमलबजावणी अचूक व गतीने व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात उतरून या प्रक्रियेची माहिती घेतली. पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंद शासकीय अभिलेखात करणे सुलभ होणार असून, भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ही नोंद अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी पहाणी दरम्यान शेतकऱ्यांना सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

जी.डी.सी. अँड ए परीक्षेचे अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानच्या वाढत्या तणावात- केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या संपूर्ण देशात देशव्यापी सुरक्षा मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत

कोकण विभागातील खारभूमी योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत- रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले 

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे उद्घाटन; राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते कराड तालुक्यात शैक्षणिक प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन* 

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले

vishwatmaklokswamivarta