vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकण विभागातील खारभूमी योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत- रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले 

कोकण विभागातील खारभूमी योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत- रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

राज्य प्रतिनिधी : कोकण विभागात भरती-ओहोटी व चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, विविध योजनांच्या लाभक्षेत्रातील पिकाखालील क्षेत्र नापिक होणे, गोड्या पाण्याचे स्त्रोत भरतीच्या पाण्यामुळे क्षारयुक्त होणे, तसेच लाभक्षेत्रातील गावांना भरती व पुराचा धोका निर्माण होणे आदी समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे बृहत आराखड्यातील नवीन योजनांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

रोजगार हमी योजनेसंदर्भात मंत्री श्री. गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार किरण सामंत शेखर निकम, वित्त विभागाचे सहसचिव विजय शिंदे, कोकण विभागाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक, जलसंपदा विभागाचे उपसचिव रोशन हटवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. गोगावले म्हणाले, सद्यःस्थितीत राज्य निधी अंतर्गत उपलब्ध निधीतून खारभूमी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. तथापि, नुकसानीस तोंड देणाऱ्या आणि भविष्यकालीन धोके लक्षात घेता नव्या खारभूमी योजनांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून साहाय्य मिळणे गरजेचे आहे

संबंधित पोस्ट

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना MT अल बहियाह आणि MT मॉम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त..

vishwatmaklokswamivarta

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुक; 21 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात; नागरिकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील· विविध कार्यक्रमांचे आयोजन· उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव होणार· लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व अनुदान वाटप होणार

त्याग आणि शिस्त हाच खऱ्या देशभक्तीचा पाया : सर्वानंद सोनोवाल

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे उद्घाटन; राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज…