vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज…

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज…

मुंबई, प्रतिनिधी: बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेश मध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे.

या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, वाहतुकीवर परिणाम होणे, तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार, 29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. 30 जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो. 31 जुलै रोजी खानदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.

विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावे. विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांच्या परिसर तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.#मुसळधारपाऊस #हवामानइशारा #आपत्तीव्यवस्थापन #सतर्कराहा #पावसाचाअंदाज #महाराष्ट्रपाऊस

संबंधित पोस्ट

महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप…

दुबईत युद्धजन्य तणाव; हजारो भारतीय अडचणीत – केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी : खासदार डॉ. कल्याण काळे

श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवंत मंदिर येथे महापूजा व घरकूल लाभार्थ्यांना घराच्या चावीचे वितरण

रायगड जिल्ह्यासाठी दि.23 व 24 मे 2026 रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा

राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन नेतृत्वगुण शिकायचे असतील तर अटलजींचे जीवन अभ्यासावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

ग्रामपंचायत निवडणूक : मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर