vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुबईत युद्धजन्य तणाव; हजारो भारतीय अडचणीत – केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी : खासदार डॉ. कल्याण काळे

दुबईत युद्धजन्य तणाव; हजारो भारतीय अडचणीत – केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी : खासदार डॉ. कल्याण काळे

               जालना प्रतिनिधी: दुबईमध्ये अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावपूर्ण परिस्थितीत हजारो भारतीय नागरिक अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल जालना मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जर एका खासदारालाही परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसेल, तर सर्वसामान्य भारतीय नागरिकांची परिस्थिती काय असेल याची कल्पना करता येते,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

   खासदार डॉ. काळे यांनी सांगितले की, ते 27 फेब्रुवारी रोजी मुंबईमार्गे दुबईला गेले होते. 28 फेब्रुवारी रोजी दुबई येथे पोहोचल्यानंतर ते आपल्या परिवारासह तसेच आणखी दोन परिवारांसोबत हॉटेलकडे जात असताना परिसरात अचानक युद्धजन्य तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे तेथील वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला आणि परतीचा प्रवास कधी होणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली.

      त्या काळात इराणसंबंधित वाढत्या तणावामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. दुबईमध्ये हजारो भारतीय नागरिक अडकले होते. विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आपण सुरक्षितपणे भारतात परत येऊ शकू की नाही, अशी भीती अनेकांच्या मनात होती, असेही त्यांनी सांगितले.

   या संदर्भात आपण तात्काळ केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाला ई-मेल व पत्राद्वारे माहिती दिली, मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत डॉ. काळे यांनी व्यक्त केली. “अशा परिस्थितीत केंद्रातील संबंधित मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना धीर देणे आवश्यक होते. किती भारतीय अडकले आहेत, त्यांना परत आणण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, याबाबत स्पष्ट माहिती देणे गरजेचे होते,” असेही ते म्हणाले.

              दुबईतील काही ठिकाणी हॉटेल बुकिंगची मुदत संपलेल्या नागरिकांच्या निवास व खर्चाची तात्पुरती व्यवस्था तेथील प्रशासनाने केल्याची माहितीही त्यांनी दिली. विमानतळ बंद असल्यामुळे अनेक नागरिकांना काही दिवस तेथेच थांबावे लागले.

                  साधारण तीन ते चार दिवसांनंतर हळूहळू विमानसेवा सुरू झाल्यानंतर काही भारतीय नागरिकांना परत येणे शक्य झाले. या कठीण काळात काही ओळखीच्या व्यक्तींनी स्थानिक पातळीवर मदत करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले.

                दरम्यान, आपल्या सुखरूप परतीसाठी मतदारसंघातील नागरिकांनी केलेल्या प्रार्थना,दुवा व दिलेल्या शुभेच्छांबद्दल डॉ. कल्याण काळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “मातृभूमीत परत आल्यानंतर एखाद्या लेकराला आईच्या कुशीत परत आल्यासारखा आनंद झाला,” असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.

या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने अधिक प्रभावी व तत्पर यंत्रणा उभारण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच संकटाच्या काळातन परदेशातील भारतीय नागरिकांशी थेट संवाद साधण्याची व्यवस्था अधिक मजबूत करावी, असेही त्यांनी नमूद केले.यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष अतिक खान, बदर भाई, श्री जयप्रकाश दादा चव्हाण, राम सिरसाठ, सोपानराव तिरुखे,कल्याणराव तारडे, देवजी नाना जऱ्हाड, काँग्रेस चे नगरसेवक व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते

000000

संबंधित पोस्ट

राज्यपालांची छेडानगर सुब्रमण्यम समाज मंदिराला भेट;चंडी महायज्ञात दिली पूर्णाहुती; पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांचे संबोधन

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांबाबत आक्षेप, हरकती आमंत्रित

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामावून घेतलेल्या वस्तीशाळा शिक्षकांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय-मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता….

राज्यात १५ हजार जागांची होणार भरती; जाणून घ्या कोणत्या जागा भरणार ? दत्तात्रय भरणे राज्यमंत्री.

vishwatmaklokswamivarta