vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – रावसाहेब पाटील दानवे

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – रावसाहेब पाटील दानवे

 

जालना, (प्रतिनिधी) : राज्य सरकारने सादर केलेला सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा तसेच विकसित भारतच्या ध्येयाला बळकटी देणारा असल्याची अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, महिला, तरुण तसेच ग्रामीण आणि शहरी विकासाला प्राधान्य देण्यात आले असून राज्याच्या आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया आहे, असे दानवे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान तसेच ‘बळीराजा मोफत वीज योजना सुरू ठेवण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठवाड्यासह दुष्काळग्रस्त भागासाठी कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी वळवण्याचा प्रकल्प आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माझी लाडकी बहीण योजना आणि लखपती दीदी उपक्रमाला दिलेले बळ तसेच तरुणांसाठी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारा ठरेल.

जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील जिल्ह्यांचा‘आकांक्षित जिल्हे कार्यक्रमात समावेश करण्यात आल्यामुळे या भागाच्या विकासाला मोठी गती मिळेल, असेही दानवे म्हणाले.

“हा अर्थसंकल्प राज्याच्या प्रगतीचा दूरदृष्टीपूर्ण आराखडा आहे. या निर्णयांमुळे महाराष्ट्र अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित होईल,” असा विश्वास रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली.राजेश जोशीस्वीय ससहाय

00000

संबंधित पोस्ट

प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये ‘वॉर्ड बाल संरक्षण समिती’ स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

कामठी-कोराडी-कन्हान विकासाला नवा आयाम मिळणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित मोर्चात बौध्दांनी ताकद दाखवावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला