vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मराठा आरक्षण उपसमितीची बैठक

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मराठा आरक्षण उपसमितीची बैठक

मुंबई, प्रतिनिधी : मराठा आरक्षण कक्षाचे कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरून हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाशी संबंधित प्रलंबित विषय आणि शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधांबाबतचा आढावा घेवून अंमलबजावणीबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या ५ जून २०२६ च्या शासन निर्णयाची सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी विनाविलंब व तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश मंत्री विखे-पाटील यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रलंबित असलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रांच्या सर्व प्रकरणांचा निपटारा तातडीने व प्राधान्यक्रमाने करावातालुकास्तरीय वंशावळ समितीस मुदतवाढ देण्याबाबतचे आदेश, तात्काळ निर्गमित करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाला बैठकीत देण्यात आले आहेत.

अधिसंख्य पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियमित सेवा विषयक लाभांबाबत प्रलंबित असलेली कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे नियुक्ती न दिलेल्या उमेदवारांच्या प्रश्नाबाबत सामान्य प्रशासन विभाग, ऊर्जा विभाग व सर्व संबंधित विभागांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा २०१७ मधील बाधित महिला उमेदवारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अप्पर मुख्य सचिव (सेवा), अप्पर मुख्य सचिव (गृह) आणि सचिव (सामाजिक विकास समन्वय) यांनी एकत्रित बैठक घेऊन संबंधित महिला उमेदवारांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

0000

संबंधित पोस्ट

बालभवन’ चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा-मुंबई उच्च न्यायालय

vishwatmaklokswamivarta

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगांसाठी पुनर्वसन सेवा सुरू AIIPMR मुंबईच्या सहकार्याने दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन व उपचार

vishwatmaklokswamivarta

जनगणना 2027 अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट दिल्ली येथील पथकाकडून जालना जिल्ह्यातील जनगणनेच्या कामकाजाचे कौतुक….

पुण्यातील आळंदी येथील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्रात पर्यटनासाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू..

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश