vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात नमुंमपा समाजविकास विभागाच्या योजनांचेही माहिती प्रसारण

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात नमुंमपा समाजविकास विभागाच्या योजनांचेही माहिती प्रसारण

         नवी मुंबई प्रतिनिधी- शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना, उपक्रम यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळावा यादृष्टीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत दि. 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शिबीर आयोजन करण्यात आले होते.

          या शिबिरांमध्ये महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागानेही स्टॉल प्रदर्शित करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 50 हून अधिक लोककल्याणकारी योजनांची माहिती या शिबिरांना मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना दिली.

          नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील परिमंडळ 2 क्षेत्रातील नागरिकांकरीता घणसोली समाजमंदिर हॉल येथे दि. 22 जुलै, 2026 रोजी व नेरुळ मातृमिलन चर्च सभागृह, सेक्टर 42-ए, सीवूड या ठिकाणी दि. 26 जुलै, 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये समाजविकास विभागाच्या स्वतंत्र स्टॉलव्दारे महानगरपालिकेच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात आली व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी असे आवाहन करण्यात आले.

          घणसोली येथील शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना. श्री. गणेश नाईक, नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता सूरज पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नेरुळ येथील शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

          या शिबिरामध्ये जिल्हाधिकारी, ठाणे व महसूल विभाग यांच्यामार्फत कार्यक्षेत्रातील गरजू व गरीब नागरिकांना उत्पन्न दाखला, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विवाह नोंदणी दाखला अशा शासनाच्या विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.0000

संबंधित पोस्ट

वनहक्क पट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे मालकी हक्कासाठी शासन प्रयत्नशील – आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके लाँग मार्च आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार -कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

जामिया इस्लामिया इशातूल उलूम संस्थेतील परकीय नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी- गृहराज्यमंत्री (ग्रामीण), डॉ. पंकज भोयर

vishwatmaklokswamivarta

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक-दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा…

vishwatmaklokswamivarta