vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंदू विधीज्ञ परिषदेचे प्रसिद्धीपत्रक*पुणे येथे ‘श्री रामनवमी उत्सव समिती’च्या वतीने पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न! हिंदु शौर्य पुरस्कार-२०२६’ने हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर सन्मानित!*

*हिंदू विधीज्ञ परिषदेचे प्रसिद्धीपत्रक*पुणे येथे ‘श्री रामनवमी उत्सव समिती’च्या वतीने पुरस्कार’ वितरण सोहळा संपन्न! हिंदु शौर्य पुरस्कार-२०२६’ने हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर सन्मानित!*

राज्य प्रतिनिधी

​ धनकवडी (पुणे) येथील ‘श्री रामनवमी उत्सव समिती’च्या वतीने आयोजित १३ व्या ‘शोभायात्रा रामराज्याची’ या सोहळ्यात हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना मानाचा ‘हिंदु शौर्य पुरस्कार-२०२६’ देऊन गौरवण्यात आले. हिंदु धर्माचे रक्षण, सामाजिक न्याय आणि कायदेशीर लढाईतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला.

​ राजर्षी शाहू बँक चौक ते धनकवडी बस स्टॉप या मार्गावर अत्यंत उत्साहात निघालेल्या भव्य शोभायात्रेचा समारोप मुख्य व्यासपीठावर पुरस्कार वितरण सोहळ्याने झाला. खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. भीमराव (अण्णा) तापकीर यांच्या हस्ते इचलकरंजीकर यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 *कायदेशीर लढा आणि उल्लेखनीय कामगिरीचा गौरव :* ​अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी प्रदीर्घ काळ हिंदूंच्या हितासाठी न्यायालयात यशस्वी लढा दिला आहे. पुरस्कार प्रदान करताना त्यांच्या खालील कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.

*१.* ​दाभोळकर आणि पानसरे खटल्यात विनाकारण गोवण्यात आलेल्या हिंदुत्ववाद्यांना विनामूल्य कायदेशीर मदत देऊन न्याय मिळवून दिला.*२.​* पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराची हडप झालेली १२५० एकर जमीन देवस्थानला परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.*३.​* मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासह अनेक कठीण प्रसंगांत हिंदूंची बाजू सक्षमपणे मांडली.*​पोलीस आणि पीडितांना न्याय मिळावा – वीरेंद्र इचलकरंजीकर*    ​ *पुरस्काराला उत्तर देताना अधिवक्ता इचलकरंजीकर म्हणाले की* , “रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही न्यायालयात निरपराध हिंदूंची बाजू मांडत आहोत. समाजाचे ऋण फेडणे हे आमचे कर्तव्य आहे. या वेळी त्यांनी आझाद मैदानावर महिला पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून दिली. त्या महिला पोलिसांना अद्याप न्याय मिळालेला नाही, तो मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाने प्रामाणिक प्रयत्न करावेत,” असे आवाहनही त्यांनी केले.

 कार्यक्रमाच्या शेवटी अधिवक्ता इचलकरंजीकर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आणि संस्थांचाही ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.*​श्री. नीलेश जोशी*हिंदु विधीज्ञ परिषद संपर्क 95455 57249

संबंधित पोस्ट

आज जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे द्वारा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त “संडे ऑन सायकल” या उपक्रमांतर्गत १० किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन

महाराष्ट्र परिवहन विभाग-  डेडलाईन संपली आता कारवाई सुरु, HSRP बद्दल RTO कडून पोलिसांकडून विशेष मोहीम..

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा*- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन!-भावपुर्ण श्रद्धांजली!!

vishwatmaklokswamivarta

अनुकंपा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना हरकत/आक्षेप अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य..