vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

उसाच्या दरात यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा  200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा : चेअरमन सतीश घाटगे  

उसाच्या दरात यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा  200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा : चेअरमन सतीश घाटगे

— राज्य प्रतिनिधी-घनसावंगी: शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून मराठवाड्यात ओळख निर्माण केलेल्या समृद्धी साखर कारखान्याने यंदाही उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला २९७० रुपये प्रती मे. टन प्रमाणे दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी सोमवारी (दि. २६) केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला देण्यात समृद्धी साखर कारखाना मराठवाड्यात आघाडीवर राहत आला आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये समृद्धी कारखान्याने गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी पेक्षा ११० रुपये अधिक भाव देत २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे अंतिम बिल दिले. तर गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये देखील समृद्धी साखर कारखान्यात गाळप झालेल्या उसाला उच्चांकी दिला आहे.

आता गाळप गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला २९७० रुपये प्रती मे. टन भाव देण्याची घोषणा केली आहे. पहिला हप्ता २५०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे दिल्यानंतर लगेच दुसरा हप्ता 200 रुपये प्रती मे. टन प्रमाणे देण्यात येणारी असल्याची माहिती समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली आहे. दुसऱ्या हप्त्याची रक्कम वाटप झाल्यांनतर तिसरा हप्ता देखील लवकर शेतकऱ्यांना देण्यात असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये थेट २९७० रुपये प्रति मे. टन दराने एफआरपीची घोषणा करत समृद्धी कारखान्याने पुन्हा एकदा ‘उस दर युद्धात’ बाजी मारली असून दोन हंगामांप्रमाणेच यंदाही इतर कारखान्यांपेक्षा अधिक दर देत ‘उस दर स्पर्धेत’ आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

————–

प्रतिक्रिया,लवकरच 200 रुपये प्रति मे. टन प्रमाणे दुसरा हप्ता जमा करणार -समृद्धी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना म्हणूनच तो चालविल्या जातो. याचा आम्हाला अभिमान आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्येही शेतकऱ्यांच्या उसाला 2970 रुपये प्रती मे. टन दर देऊन शेतकऱ्यांचा विश्वास जपला आहे.पहिला हप्ता २५०० रुपये प्रती मेट्रिक टन प्रमाणे अदा केला आहे. लवकरच 200 रुपये प्रति मे. टन प्रमाणे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.  -सतीश घाटगे, चेअरमन समृद्धी साखर कारखाना

संबंधित पोस्ट

.म्हाडा लोगो गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश – मंत्री शंभूराज देसाई

जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा..

मुंबईतील ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये लागली आग..

vishwatmaklokswamivarta

मानवरत्नांच्या हस्ते श्री क्षेत्र कपिलधार येथील ३० व्या राज्यव्यापी मेळाव्यात पुरस्काराचे वितरण होणार”‘शिवा संघटनेचे २०२५ चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर’ … प्रा. मनोहर धोंडे

vishwatmaklokswamivarta

कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सची उद्या व्यापार परिषद२८ वा वर्धापन दिननिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन