vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारत कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

भारत कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

सातारा प्रतिनिधी :- राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेच्या माध्यमातून भारत कौशल्य स्पर्धा २०२६-२७ या देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जात असून, विविध व्यावसायिक व तांत्रिक तसेच इतर कौशल्यांमध्ये २३ वर्षांखालील युवक-युवतींना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाते.

 

जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तरावरील निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील भारत कौशल्य २०२६-२७ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर जागतिक स्तरावरील जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

 

जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कौशल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झळाळी देण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी https://www.skillindiadigital.gov.in/home या वेबसाईटवर भेट द्या अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, ०२१६२ २३९९३८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृह आदींच्या सद्यस्थितीचा अहवाल सात दिवसात द्या – पालकमंत्री पंकजा मुंडे- शाळा दुरुस्तीचा निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश- आदर्श शाळा, आधुनिक ग्रंथालये आणि रेशीम ब्रँडिंगसाठी कालबद्ध आराखडा तयार करा

vishwatmaklokswamivarta

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सविस्तर आढावा सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ.

भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत वलसाड येथील अल्प्राझोलम बनवणारा कारखाना उध्वस्त करून बहु-राज्यीय ड्रग्ज नेटवर्क आणले उघडकीला ; 22 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन