vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

फलटण येथे पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शनास वारकऱ्यांचा प्रतिसाद

फलटण येथे पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शनास वारकऱ्यांचा प्रतिसाद

सातारा प्रतिनिधी  :- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत ‘संवाद वारी’ या शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची, उपक्रमांची माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे, एलईडी व्हॅन, कलापथक व्हॅन तसेच चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे.

फलटण येथे या उपक्रमाचे नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील रुपाली तारळकर यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हे प्रदर्शन मांडणी करण्यात येत असून मुक्काम तळांसोबत संपूर्ण मार्गावर चित्ररथ, कलापथक तसेच एलइडी व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती करण्यात येत आहे.

शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या ३० फ्लेक्स पॅनेलचा या प्रदर्शनात समावेश आहे. या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, प्रधानमंत्री पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धीमत्ता एआय धोरण, मागेल त्याला शेततळे, लेक लाडकी योजना, नवीन शैक्षणिक धोरण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आश्रम शाळा सुविधा, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, महाराष्ट्र रोजगार हमी योजना तसेच कृषी विभागाचे डिजिटल उपक्रमांची माहिती, महासन्मान निधी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, मागेल त्याला शेततळे, लेक लाडकी योजना, पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना, आश्रम शाळा सुविधा, हरित ऊर्जा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र गृहनिर्माण योजना, दिव्यांग धोरण, शाश्वत जलसंपदा व्यवस्थापन व विकास, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र रोजगार हमी योजना आदी योजनांबाबत आकर्षक एलईडी चित्ररथ तसेच पथनाट्य व प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईतील स्वच्छता विषयक ‘सुविधा केंद्र’ उपक्रम पथदर्शी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· मुंबईत २४ केंद्रे, ९ प्रगतीपथावर· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ…

vishwatmaklokswamivarta

सुशिक्षित बेरोजगारांनी आपली उमेदवार नाव नोंदणी मधील माहिती अद्यावत करावी

महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य*

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..

महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन