vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त बॅंक ऑफ महाराष्ट्र,ठाणे अंचल कार्यालयातर्फे महिला मेळावा संपन्नमेळाव्यामध्ये एकूण 52 बचतगटांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवाटप..

जागतिक महिला दिनानिमित्त बॅंक ऑफ महाराष्ट्र,ठाणे अंचल कार्यालयातर्फे महिला मेळावा संपन्नमेळाव्यामध्ये एकूण 52 बचतगटांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवाटप..

ठाणे, प्रतिनिधी:- जागतिक महिला दिनानिमित्त बॅंक ऑफ महाराष्ट्र, ठाणे अंचल कार्यालयातर्फे ठाणे जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये महिला बचतगट मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये एकूण 52 बचतगटांना रु.2 कोटी 65 लाखाचे कर्जवाटप करण्यात आले.

हा मेळावा बॅंक ऑफ महाराष्ट्र, ठाणे अंचल प्रबंधक राजकिशोर रंजीत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील मेळाव्यामध्ये 19 बचतगटांना 1 कोटी 40 लाख रुपयांची कर्ज मंजूरी करण्यात आली.पडघा येथील मेळाव्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अभिषेक पवार यांनी महिलांना आर्थिक साक्षरतेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच बचतगटांच्या माध्यमातून नवनवीन उद्योग/ व्यवसाय चालू करून आर्थिक उन्नती करावी, याबद्दलही मार्गदर्शन केले.

या मेळाव्यासाठी कृषी अधिकारी, ठाणे अंचल कार्यालय समीर डुकरे, बॅंक ऑफ महाराष्ट्र, पडघाचे शाखाधिकारी सुशील पांडे व शाखेतील इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत असलेल्या बचतगटातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

00000

वृत्त क्र.173/2025

संबंधित पोस्ट

मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी..

उल्लास’ साक्षरता अभियानाची परीक्षा आता 29 मार्चला;नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश

अभिलेख वर्गीकरण करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा परिषद; शनिवार, रविवारी सुरू राहणार कामकाज

राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न