vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड

राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: दाखलपूर्व व प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा तसेच सामोपचाराने वाद मिटावेत या उद्देशाने रायगड जिल्ह्यात ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र द. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या लोक अदालतीत वादपूर्व व दाखल अशी एकूण ७ हजार ७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तब्बल २० कोटी ५५ लाख २० हजार ६१५ रुपयांची तडजोड करण्यात आली.

राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र द. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी अलिबाग येथील न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे उपाध्यक्ष अनंत पाटील, सचिव अमित देशमुख तसेच जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, वकील वर्ग आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. रायगड जिल्ह्यात या लोक अदालतीसाठी २५ हजार ६८१ वादपूर्व आणि १२ हजार १९४ प्रलंबित अशी एकूण ३७ हजार ८७५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ५९ वादपूर्व आणि ३ हजार १९ प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर श्रीमती तेजस्विनी म. निराळे यांनी दिली.

एक जोडप्याचा संसार पुन्हा जुळलालोक अदालतीदरम्यान पाली येथील एका जोडप्याचा कौटुंबिक वाद मिटून त्यांचा संसार पुन्हा सुरळीत झाला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले.

२१ मोटार अपघात प्रकरणांत २.२८ कोटींची नुकसानभरपाई मंजूरदरम्यान, जिल्ह्यातील २१ मोटार अपघात प्रकरणांत तडजोड होऊन संबंधित पक्षकारांना २ कोटी २८ लाख ६२ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली.लोक अदालतीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये २७ कक्ष स्थापन करण्यात आले होते. काही प्रकरणांमध्ये पक्षकारांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलद्वारेही सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या उपक्रमाला अलिबाग वकील संघटना तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका वकील संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी न्यायिक अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा परिषद, रायगड पोलीस प्रशासन आणि सर्व पक्षकारांचे सहकार्य लाभल्याबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी आभार मानले.

0000

संबंधित पोस्ट

रोबोटिक बोयो” ठरतोय खऱ्या अर्थाने जीवनरक्षक..विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या नियुक्त्यांची आज घोषणा*

कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात आज  सदिच्छा भेट घेतली.

सामान्य प्रशासन विभागातर्फे आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta