vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल,स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन..

मुंबई, प्रतिनिधी : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राजनैतिक अधिकारी, वाणिज्यदूत, विविध देशांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांचे स्वागत केले. भारताची प्रगती, महाराष्ट्राची आर्थिक ताकद आणि भविष्यातील विकासदृष्टी यांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विविध देशांचे महावाणिज्य दूत, कौन्सुलर कॉर्प्सचे डीन आणि पोलंडचे महावाणिज्य दूत थॉमस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मंत्री छगन भुजबळ, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात प्राचीन आणि वैविध्यपूर्ण संस्कृतींपैकी एक असून समावेशकता, सहिष्णुता आणि विविध विचारांचा स्वीकार ही देशाची वैशिष्ट्ये आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि जागतिक घडामोडींमध्ये निर्णायक भूमिका बजावणारा देश म्हणून उदयास येत आहे. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने स्थान प्राप्त केले असून लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सपेक्षा मोठ्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दशकात भारताने गरिबी निर्मूलन, पायाभूत सुविधा विकास, नवकल्पना, तंत्रज्ञान आणि मानव संसाधन निर्मिती या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. भारतीय प्रतिभेने केवळ देशातीलच नव्हे तर जागतिक उद्योगविश्वालाही दिशा दिली आहे. हा नवा भारत विकासाचे नवे मानदंड निर्माण करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे शक्तिकेंद्र असल्याचे सांगताना त्यांनी राज्याची औद्योगिक, तांत्रिक आणि नवोन्मेष क्षेत्रातील आघाडी अधोरेखित केली. महाराष्ट्र हा देशाचा उत्पादन क्षेत्रातील अग्रणी प्रदेश, तंत्रज्ञान केंद्र, स्टार्टअपची राजधानी आणि गुंतवणुकीचे प्रमुख आकर्षण केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई ही केवळ आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन क्षेत्राची राजधानी नसून जागतिक गुंतवणूक आकर्षित करणारे महत्वाचे केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि नवी मुंबई परिसर देशाची डेटा सेंटर राजधानी म्हणूनही उदयास येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात उभारण्यात येत असलेल्या वाढवण बंदराचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताच्या सागरी सामर्थ्याला नवी दिशा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. सध्या देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा हे बंदर तीनपट मोठे असेल आणि जगातील अव्वल दहा बंदरांमध्ये त्याचा समावेश होईल.

संबंधित पोस्ट

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ आतापर्यंत १,८०० शाळांमधील ७.५ लाख विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी पूर्ण…

जनगणना कार्य अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**जनगणना प्रशिक्षण संपन्न; डिजिटल जनगणनेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन*

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा अर्जास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची  राज्य सरकारची तयारी- उपमुख्यमंत्री अजित पवार