vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात ७७.९७% गणना प्रपत्र प्राप्त

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात ७७.९७% गणना प्रपत्र प्राप्त

मुंबई, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण सुरू असून, घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२६ रोजी संपत आहे. राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी आतापर्यंत ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० (७७.९७ टक्के) मतदारांचे गणना प्रपत्र भरून व स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहे.गृहभेटीनंतर १ कोटी ८७ लाख ५६ हजार २३१ (१९.१७ टक्के) मतदार ‘गणना प्रपत्र जमा न होणे’ (Uncollectable EF) या प्रवर्गात नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये सापडू न शकलेले किंवा गैरहजर ६३ लाख ६१ हजार ११३, कायमस्वरूपी स्थलांतरित ७१ लाख ९५ हजार ३८८, मृत ३३ लाख ९४ हजार ५३, अन्यत्र नोंदणी केलेले अथवा दुबार १६ लाख ६२ हजार १२१ आणि इतर प्रवर्गातील १ लाख ४३ हजार ५५६ मतदारांचा समावेश आहे.

एकूण मतदारांपैकी ९ कोटी ५० लाख ५५ हजार ५९१ (९७.१४ टक्के) मतदारांबाबतची कार्यवाही पूर्ण झाली असून, २७ लाख ९८ हजार ४५८ (२.८६ टक्के) मतदारांबाबतची कार्यवाही अद्याप बाकी आहे.

‘गणना प्रपत्र जमा न होणे’ प्रवर्गातील मतदारांच्या नावांच्या याद्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत किंवा प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे.

या याद्यांमध्ये नाव असलेल्या मतदारांच्या वास्तव्याबाबत मतदार किंवा बीएलए यांनी संबंधित बीएलओ यांना माहिती दिल्यास प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांचे गणना प्रपत्र १७ ऑगस्टपर्यंत भरून घेता येणार आहे. याबाबत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना १२ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली असून, संबंधित बीएलए यांनी याद्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण,नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत ‘मेगा प्रोजेक्ट’ देऊ  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर;मुंबई टेक वीक अधिक भव्य असेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· दि 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘मुंबई टेक वीक’ होणार· ओपन ए आय,मेटा, एंथ्रॉपिक आणि क्लाउडगुगल यांसारख्या जागतिक अग्रगण्य ए आय कंपन्यांचा सहभाग· दहा हजाराहून अधिक डेव्हलपर्स आणि तंत्रज्ञानप्रेमींची उपस्थिती अपेक्षित..

vishwatmaklokswamivarta

वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक…

अनुदानित खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक;२६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री व साठ्यात आढळली तफावत

vishwatmaklokswamivarta

सेल (CARGO)’ वाहतुकीमुळे रात्रीच्या वेळी वाहतुकीत बदल..

vishwatmaklokswamivarta

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट,कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती..