vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाची १८ मार्चपर्यंत मुदतवाढ

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाची १८ मार्चपर्यंत मुदतवाढ

 

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद ठाणे) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. १७ फेब्रुवारी, २०२६ ते दि. १० मार्च, २०२६ या कालावधीत सुरू होती. पालकांना अर्ज भरण्यासाठी शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालये तसेच बालकांच्या पालकांनी शासनाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालकांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता बुधवार, दि. १८ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तरी पात्र वंचित व दुर्बल घटकांतील बालकांच्या पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन निर्धारित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि शाळांनीही ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही सूचित करण्यात आले आहे.
आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत असून या योजनेचा लाभ पात्र बालकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
000

संबंधित पोस्ट

संरक्षित शेतीसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट… दिवंगत पुरण कुमार यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा..

खाणीतील कामगारांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अनुदान

भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन,आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा..दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान3 डिसेंबर 2025 मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta