vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत विजेत्या गणेशोत्सव मंडळाची नावे जाहीर विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळ राज्यात प्रथम

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत विजेत्या गणेशोत्सव मंडळाची नावे जाहीर विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळ राज्यात प्रथम

        सांगली, प्रतिनिधी: राज्य शासनाने दिनांक 14 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयान्वये गणशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना पुरस्कार देण्यात येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2025 मधील राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पारितोषिक विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नावे घोषित करण्यात आली असून खानापूर तालुक्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ विटा या मंडळास राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.    जिल्हास्तरीय ‍व्दितीय क्रमांक मोरया गणेश मंडळ, येडेनिपाणी, ता. वाळवा व तृतीय क्रमांक शिवाजी गणेशोत्सव मंडळ मिरज, ता. मिरज यांना प्राप्त झाला आहे.

        तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त गणेशोत्सव मंडळ पुढीलप्रमाणे –ओमकार गणेश मंडळ, मायथळ ता. जत, नवतरूण गणेश मंडळ माळेवाडी ता. शिराळा, वर्चस्व गणेशउत्सव मंडळ ता. पलूस.

     सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०२५ मधील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये रु.७,५०,०००/-, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये रू. ५,००,०००/- व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये रु. २,५०,०००/- इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास अनुक्रमे रु.५०,०००/-, रु.४०,०००/- व रु.३०,०००/- इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे आणि तालुकास्तरीय विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांस प्रत्येकी रु. २५,०००/- इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी स्थापित 26 समित्यांच्या कामकाजाचा विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ओवे मैदान, खारघर येथे आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते मौजे सिरसवाडी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन

जिल्ह्यातील 7शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ घेण्याचे आवाहन

जनाई-शिरसाई सिंचन योजना; बंदिस्त नलिका प्रणालीनिविदा प्रक्रिया एक महिन्यात करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील