vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त मौजे विठलापूर, दिघंची, पळसखेल व आवळाई या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विटा डॉ. विक्रम बांदल, आटपाडीच्या तहसीलदार शितल बंडगर, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेऊन महसूल व कृषी विभागातील संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करून मदत मिळवून दिली जाईल. शेतकऱ्यांनी धैर्याने या संकटाचा सामना करावा, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा दिलासा शेतकऱ्यांना त्यांनी यावेळी दिला.

00000

संबंधित पोस्ट

वसतिगृहांसाठी सैनिकांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू

vishwatmaklokswamivarta

इलेक्ट्रिक ट्रक’ निर्मितीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी-पुरवणी मागण्यांमध्ये 3 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी..

जिल्हा वार्षिक योजना निधीतून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर बांधलेल्या किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

बीड जिल्ह्यातील हत्याकांड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या ताब्यात सीआयडीला शरण, बीड पोलिसांच्या ताब्यात.

vishwatmaklokswamivarta