vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा*

*विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा*

 

सातारा, प्रतिनिधी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत विविध उपकंपन्यांमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजनांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यव्सथापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांनी केले आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अखत्यारीतील पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण नाईक आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध समाजघटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी योजना राबविण्यात येत आहेत

महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज योजना तसेच गट कर्ज योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून स्वयंरोजगार, व्यवसायवृद्धी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजना उपयुक्त ठरणार आहेत

सातारा जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत. योजनांबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी बिल्डिंग, सर्व्हे क्र. २२-अ, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलाजवळ, सातारा येथे संपर्क साधावाजिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या या आर्थिक विकास योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार व आर्थिक प्रगतीची संधी साधावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण म. गिन्हे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात नमुंमपा समाजविकास विभागाच्या योजनांचेही माहिती प्रसारण

निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी,जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश,मिशन मोडवर कार्यवाही; अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्याचे आदेश..

शेतीसाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांतील शासकीय ठेवी काढून घ्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील  

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे राणीउंचेगाव येथे एकदिवसीय शेतकरी मेळावा संपन्न