vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस-जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी…

अमरावती प्रतिनिधी: जिल्हा स्त्री रुग्णालयातील २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील बाधित बालकांची महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. त्यांनी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी) तसेच मुरके हॉस्पिटलला भेट देऊन उपचारधीन बालकांच्या आरोग्याची माहिती घेतली, तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त नवजात अतिदक्षता विभागाची पाहणी केली.पीडीएमसी आणि मुरके रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही नवजात बालकांची प्रकृती धोक्याबाहेर आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर उर्वरित बालकांवर विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पालकमंत्री बावनकुळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बालकांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच, उपचाराधीन बालकांच्या माता-पित्यांची भेट घेऊन त्यांना धीर देत “राज्य शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास दिला.

त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी करून प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनेच्यावेळी जीवाची बाजी लावून नवजात बालकांना अतिदक्षता विभागातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या परिचारकांशी त्यांनी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.यावेळी रुग्णालयातील सुरक्षितता आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

संबंधित पोस्ट

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ,• ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ• कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांचा जालना जिल्हा दौरा

महाबळेश्वर तालुक्यातील प्रमाणभूत क्षेत्राची अनुसूची प्रसिध्द- तहसीलदार तेजस्विनी पाटील

फणसावरील संशोधनासाठी कृषी विद्यापीठांतर्गत केंद्र स्थापन करण्यात येईल- कृषिमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊनबैठक घेण्याचे सभापतींचे निर्देश..

बीड-परळी रेल्वेमार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महत्वाच्या विकास प्रकल्पांचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

vishwatmaklokswamivarta