vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे राणीउंचेगाव येथे एकदिवसीय शेतकरी मेळावा संपन्न

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे राणीउंचेगाव येथे एकदिवसीय शेतकरी मेळावा संपन्न

जालना, प्रतिनिधी  : महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे आज दि. 25 ऑगस्ट रोजी राणीउंचेगाव येथे एक दिवसीय शेतकरी मेळावा संपन्न झाला.या एक दिवसीय शेतकरी मेळाव्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या बँके मार्फत राबावण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीस पूरक जोड धंदे वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे असे श्री मंगेश केदार यांनी यावेळी सांगितले.

मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार उपस्थित होते. तसेच महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे संचालक गिरीश सुलताने, प्रशिक्षक दाभाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अनुराधा बोराडे आणि कमलेश भुरेवाल यांनी केले. या मेळाव्यात प्रशिक्षणार्थी आणि गावकरी यांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर ६ ते ९ जूनदरम्यान पसंतीक्रम नोंदविण्याची संधी; १३ जूनला प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध होणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (#एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत ऐरोलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांची महामानवाला अभिवादन…

.सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी, फेरफार प्रक्रिया झाली गतिमान- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्‌वाखाली महसूल विभागाची विशेष मोहीम- अधिकार अभिलेखात नावनोंदणी होणार जलद- शेतकरी, सामान्य नागरिकांच्या पैसे व वेळेत बचत

vishwatmaklokswamivarta