vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (#एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (#एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (#एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया कोणताही हस्तक्षेप सहन न करता पारदर्शक पद्धतीने राबविल्यामुळे केवळ डिझेल खरेदीतून दरवर्षी सुमारे २४१ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दररोज एसटीच्या उत्पन्नापेक्षा १ ते २ कोटी रुपये अधिक खर्च होत असल्याने केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. चालू आर्थिक वर्षात डिझेल बचतीबरोबरच जाहिरातीतून सुमारे २५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

एसटीमध्ये आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि स्वावलंबन वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करून एसटीला सक्षम व टिकाऊ बनवण्याचा आमचा निर्धार आहे. पुढील आर्थिक वर्षात स्क्रॅपिंग प्रकल्प, चालक-वाहकांच्या ड्युटीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अतिकालीन भत्त्यावर नियंत्रण, तसेच इतर उपाययोजना राबवून किमान ५०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित पोस्ट

बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता

राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर१५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा- प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

विकसित,प्रगत महाराष्ट्राचा निर्धार नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील मशीद स्फोट प्रकरण- दोन्ही आरोपींविरोधात यु ए पी ए लागू…

vishwatmaklokswamivarta