vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गोवा बनावटीची अवैध दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

गोवा बनावटीची अवैध दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सातारा प्रतिनिधी: निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सातारा या कार्यालयाने दिनांक 22 जानेवारी रोजी मौजे सालपे ता. फलटण जि.सातारा येथे हॉटेल मधुसागर मध्ये बेकायदशीर गोवा बनावटीच्या विदेशी मद्यावर महाराष्ट्र राज्यातील बनावट लेबल चिटकावून विक्री करणाऱ्या ठिकाणावरुन आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींच्या ताब्यातून त्यांच्याकडील 5 लाख 61 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा कार्यालयाने केली. कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, विजय मरोड, पांडुरंग कुंभार, सागर आवळे, अजित रसाळ, राणी काळोखे, आबासाहेब जानकर, अरूण जाधव, बाळासो पांचुदे यांनी भाग घेतला. गुन्ह्याच्या पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण भरारी पथक, सातारा हे करीत आहेत.

जिल्ह्यामध्ये कोणत्याही बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक होत असल्यास त्याची माहिती तात्काळ राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास देण्यात यावी, असे आवाहन अधीक्षक श्री. भुतकर यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्धएकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार..

टीआरटीआयच्या वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते प्रकाशन

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे 

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक