vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत श्रीवर्धन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत श्रीवर्धन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’ अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, जसवली यांच्या वतीने दि. 20 सप्टेंबर रोजी राज्य परिवहन आगार, श्रीवर्धन येथे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात नागरिकांची विविध आजारांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी शिबिरास भेट देऊन उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.शिबिरात एकूण 74 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 60 पुरुष आणि 14 महिला सहभागी झाल्या. तपासणीदरम्यान 58 नागरिकांना औषधोपचार, 14 जणांची अस्थिरोगविषयक तपासणी तसेच 2 बालरुग्णांची तपासणी करण्यात आली.

या उपक्रमास मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड यांचे सहकार्य लाभले.

संबंधित पोस्ट

आरोग्य विभागाची गरुडझेप : २८ बालकांना थॅलेसिमियामुक्त नवजीवन!जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त ‘एचएलए’ तपासणी शिबिर 

आयुष्मान कार्डसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत

vishwatmaklokswamivarta

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर;-नागरिकांनी घाबरुन न जाता सूचनाचे पालन करावे – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांनी ABDM अंतर्गत HFR व HPR नोंदणी करण्याचे आवाहन,डिजिटल आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील नोंदणी आवश्यक

कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी-नागरिकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

एचपीव्ही लसीकरणाचे महत्व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- एचपीव्ही लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, शंका असल्यास अधिकृत वैद्यकिय  व्यवसायिकांचा सल्ला घ्या- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 28 जून 2026 रोजी..