vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

कोरेगाव येथे 29 सप्टेंबर रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन बेरोजगारांनी लाभ घेण्याचे आवाहन

कोरेगाव येथे 29 सप्टेंबर रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन बेरोजगारांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

सातारा प्रतिनिधी :- सध्याच्या बदलत्या काळात नोकरीसाठी अनुभवासोबतच आधुनिक कौशल्यांची नितांत गरज निर्माण झाली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना मिळवून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी कोरेगाव दर्पण कॉम्प्युटर येथे महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातील धनाजी बागल यांनी केले आहे.

कोरेगाव येथील दर्पण काम्प्युटर येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकसंवाद-2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण, दर्पण काम्प्युटरचे संस्थापक संतोष नलावडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आधुनिक उद्योगजगताला अपेक्षित असलेले कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि रोजगाराच्या शोधात असलेले तरुण यांच्यातील दुवा साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

कोरेगाव तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी आपल्या अनुभवाला आणि शिक्षणाला योग्य संधी मिळवून देण्यासाठी या महाकुंभ रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बागल यांनी केले.

0000

 

संबंधित पोस्ट

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेचा ९९ वा स्थापना दिवस राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत पशुपालकांना लाभ देण्यासाठी सक्रिय पावले

गौण वनोपजांकरिता वाहतूक परवानाबाबत कार्यपद्धती निश्चित* 

vishwatmaklokswamivarta

मुरघास संयंत्र वाटप योजना : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड  

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया उद्योगांना मोठे अनुदान10 टन क्षमतेचे तेल काढणी युनिट, मिनी ऑईल मिल, 250 मे. टन गोदाम व कडधान्य प्रक्रिया-पॅकेजिंग युनिटसाठी अर्जाची मागणी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू