vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी मुंबईत सातव्या दिवशी 3821 श्रीगणरायांना सुसज्ज व्यवस्थेत भावपूर्ण निरोप

नवी मुंबईत सातव्या दिवशी 3821 श्रीगणरायांना सुसज्ज व्यवस्थेत भावपूर्ण निरोप

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-    नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व नैसर्गिक आणि 156 कृत्रिम विसर्जनस्थळी केलेल्या सुसज्ज विसर्जन व्यवस्थेमध्ये सातव्या दिवशी 3821 श्रीगणेशमूर्तींना भाविकांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात भावपूर्ण निरोप दिला.

          शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणशील दृष्टीकोन जपणा-या गणेशभक्तांना महापौर श्रीम.सुजाता पाटील व पदाधिकारी आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या स्वाक्षरीचे ‘पर्यावरण व स्वच्छतामित्र’ असे विशेष प्रशस्तिपत्र आणि प्लास्टिक पिशव्यांना नकार, कागदी किंवा कापडी पिशवीचा स्विकार असा संदेश असणारी कागदी पिशवी देऊन सन्मानित करण्यात आले. ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्याच्या आवाहनास पर्यावरणाविषयी जागरूक असणा-या नवी मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

          सर्वच विसर्जन स्थळांवर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सोयी पुरविण्यात आलेल्या होत्या. नागरिकांना विसर्जनस्थळी निरोपाची आरती करण्यासाठी स्वतंत्र टेबलची पुरेशा संख्येने मांडणी करण्यात आलेली होती. निर्माल्य टाकण्यासाठी ओल्या व सुक्या स्वतंत्र निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ते संकलित निर्माल्य वाहून नेण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 प्रमाणे दररोजच्या कच-याचे घरापासूनच ओला, सुका, घरगुती घातक व सॅनिटरी अशा 4 प्रकारे वर्गीकरण करण्याविषयी फलकांव्दारे तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे आवाहन करण्यात आले.

          नैसर्गिक विसर्जन स्थळांवर आकाराने मोठ्या श्रीमूर्तींसाठी तराफ्यांची व्यवस्था होती तसेच आवश्यक विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था करण्यात आली होती. नैसर्गिक विसर्जन स्थळापासून नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत त्याठिकाणी वैद्यकीय पथके तैनात होती व विसर्जन व्यवस्थित रितीने व्हावे याकरिता आवश्यक संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्ड्स विभाग कार्यालयांमार्फत कार्यरत होते. यासोबत नमुंमपा अग्निशमन दलाचे जवानही सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष होते.

          कृत्रिम विसर्जन स्थळांवरही सुयोग्य व्यवस्था होती. 156 इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे तसेच सुसज्ज पोलीस यंत्रणेमुळे सर्व ठिकाणचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले.

          नवी मुंबईतील 22 व 14 गाव परिसरातील 11 नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच 156 कृत्रिम विसर्जन स्थळे याठिकाणी 3613 घरगुती तसेच 208 सार्वजनिक मंडळांच्या 3613 श्रीमूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे संपन्न झाले. यामध्ये शाडू मातीच्या 603 श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

 

          यामध्ये बेलापूर विभागात 5 नैसर्गिक व 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 369 घरगुती व 14 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

          नेरुळ विभागात 2 नैसर्गिक व 24 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 445 घरगुती व 25 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.
          वाशी विभागात 2 नैसर्गिक आणि 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 327 घरगुती व 11 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

          तुर्भे विभागात 3 नैसर्गिक व 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 552 घरगुती व 39 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

          कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक व 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 582 घरगुती व 80 सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले.

           घणसोली विभागात 4 नैसर्गिक व 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 800 घरगुती व 9 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

          ऐरोली विभागात 3 नैसर्गिक व 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 302 घरगुती व 16 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.

          दिघा विभागात 1 नैसर्गिक व 10 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 236 घरगुती व 09 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. दिघा विभागांतर्गत १४ गावांमध्ये 05 श्री गणेश मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले.

          अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 189 विसर्जन स्थळांवर 3613 घरगुती व 208 सार्वजनिक अशा एकूण 3821 श्रीगणेशमूर्तींना गणपतीबाप्पा मोरया अशा गजरात भावभक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.

          अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व विसर्जन स्थळांवर असणारी यंत्रणा आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सक्षमतेने कार्यरत असणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. वाहतुक पोलीस विभागाच्या वतीनेही वाहतुक मार्गंविषयी सूचना प्रसारित करण्यात येत आहे.

          महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव’ साजरा करण्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून अनेकांनी शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे तसेच कृत्रिम तलावात श्रीमूर्ती विसर्जन करून स्वकृतीतून पर्यावरण जपणूकीचा संदेश प्रसारित केला आहे. अशाच प्रकारचे सहकार्य अनंतचतुर्दशीदिनी होणा-या विसर्जनप्रसंगीही नागरिकांनी द्यावे व घराजवळच्या कृत्रिम तलावात श्रीमूर्तींचे शांततेने व भाविकतेने विसर्जन करावे असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता· नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळातर्फेकर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार   

रायगड जिल्ह्यात 25 मे ते 8 जून 2025 दरम्यान जमावबंदी लागू–अपर जिल्हादंडाधिकारी

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा आज होणार सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात गौरवमुर्तींचा सन्मान सोहळा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन