vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई प्रतिभावंतांचे शहर म्हणून उदयास येईल – नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी महापौर श्रीम. सुजाता पाटील यांचे प्रतिपादन

नवी मुंबई प्रतिभावंतांचे शहर म्हणून उदयास येईल – नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी महापौर श्रीम. सुजाता पाटील यांचे प्रतिपादन

 

   नवी मुंबई प्रतिनिधी-   जिंकल्याचा निश्चित अभिमान बाळगा पण त्याचा गर्व करू नका आणि पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने तयारी करा, उद्याचा दिवस तुमचाच असेल अशा प्रेरणादायी शब्दात मनोगत व्यक्त करीत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नवी मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्तम गुणवत्ता असून हे शहर प्रतिभावंतांचे शहर म्हणून उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला.

           नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट् राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे यांच्या संयुक्त विद्‌यमाने आयोजित ‘नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2026 -2027’ शुभारंभ प्रसंगी महापौर महोदया आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.

          याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती श्री अशोक पाटील, क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती श्री गिरीश म्हात्रे व उपसभापती श्री रॉबिन मढवी, नगरसेवक श्री निशांत भगत व श्रीम. श्रेया जिरगे, क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम अभिलाषा म्हात्रे व क्रीडा अधिकारी श्री रेवप्पा गुरव, शालेय क्रीडा स्पर्धा समिती सदस्य श्री धनंजय वनमाळी, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ असोसिएशनचे सहसचिव डॉ. दीपक तांडेल, झेनिथ इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन श्री अवनीश सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम धनश्री आंगणे, विश्वस्त श्री.आशिष सिंग, प्राचार्य श्रीम. रुबी वर्गीस आदी मान्यवर उपस्थित होते.

          याप्रसंगी बोलताना स्थायी समितीचे सभापती श्री अशोक पाटील यांनी नवी मुंबईतील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये २५० हून अधिक शाळातील ४० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असल्याबद्दल तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

          क्रीडा समितीचे सभापती श्री गिरीश म्हात्रे यांनी याप्रसंगी बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेला सन २००९ पासून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मान्यता प्राप्त झाली असून, मागील १६ वर्षांपासून महानगरपालिकेमार्फत या स्पर्धांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. या स्पर्धांमध्ये अनुदानित ४९ क्रीडा प्रकार तसेच विनाअनुदानित ४८ क्रीडा प्रकार, अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात येतो व या माध्यमातून नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना वाव देणे आणि त्यांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश मोठ्या प्रमाणात साध्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

          सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ महापौर श्रीमती सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेने संपन्न झाला. या स्पर्धेत १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील व १९ वर्षांखालील मुले व मुली अशा विविध वयोगटांचा समावेश असून, ८०० हून अधिक मुली व ८५० हून अधिक मुले असे एकूण १,६५० हून अधिक विद्यार्थी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून या मधील विजेत्यांना थेट विभागीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरवदेशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार पुणे सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (रिहॅब) ने होळीच्या रंगांनी पसरवल्या रुग्णांसाठी आनंदाच्या छटा…

नवी मुंबई महानगरपालिकेचा 6704.43 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर-स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प…

मोताळा तालुक्यातील अवसायनातील 34 संस्थांची नोंदणी रद्द होणार;आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात हुंडामुक्तीचा विचार रूजवण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे-हुंडामुक्ती अभियानांतर्गत 39 अंगणवाडी सेविकांचा सत्कार