vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद**१०२ जणांची आरोग्य तपासणी; ५० जणांचे रक्तदान, १५ जणांची अवयवदानासाठी नोंदणी*

*सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद**१०२ जणांची आरोग्य तपासणी; ५० जणांचे रक्तदान, १५ जणांची अवयवदानासाठी नोंदणी*

 

गडचिरोली, प्रतिनिधी : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आज आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, स्वेच्छा रक्तदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला अधिकारी-कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १०२ जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर ५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

आरोग्य तपासणीदरम्यान आवश्यकतेनुसार विविध तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ५३ जणांची ईसीजी, ५८ जणांची रक्त तपासणी आणि ४८ जणांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये ५ जण पूर्वीपासून उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे, तर ८ जणांमध्ये उच्च रक्तदाबाचा संशय आढळून आला. त्याचप्रमाणे ५ जण पूर्वीपासून मधुमेहाने ग्रस्त असल्याचे, तर ४ जणांमध्ये मधुमेहाचा संशय आढळला. दोन जणांना पूर्वीपासून उच्च रक्तदाब व मधुमेह हे दोन्ही आजार असल्याचे, तर अन्य दोन जणांमध्ये या दोन्ही आजारांचा संशय आढळून आला. एका महिलेची स्तन कर्करोगविषयक तपासणीही करण्यात आली.

शिबिरात आरोग्य तपासणीसोबत विविध आरोग्य व सामाजिक योजनांबाबतही जनजागृती करण्यात आली. यावेळी १५ जणांनी अवयवदानासाठी नोंदणी केली, तर ५ लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले. रक्तदान शिबिरात ४९ पुरुष व एका महिलेसह एकूण ५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, उपजिल्हाधिकारी स्मिता मोरे व स्मिता बेलपत्रे, तहसीलदार संतोष आष्टीकर व संजय जयस्वाल यांच्यासह महसूल, आरोग्य तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बुलढाण्यात महत्वाचे पाऊल-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील* एचपीव्ही लसीकरण मोहीम लवकरच सुरू   * 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस

vishwatmaklokswamivarta

एच आय व्ही संसर्गित रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे,जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

सातरगावात ‘एचपीव्ही’ लसीकरण विशेष सत्र उत्साहात

राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय…

येळेगाव येथे #राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ