vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यइतरप्रदेशस्थानिक बातम्या

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

सांगली, प्रतिनिधी : घरेलु कामगार महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत मोफत उपचार झालेल्या महिलांनी दसऱ्याचे औचित्य साधत उपचार केलेल्या रूग्णालयाला भेटीद्वारे आनंद सोहळा साजरा केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे व उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आपट्याची पानेरूपी सोने देऊन आभार व्यक्त केले.

 विजयादशमी, दसऱ्याचे औचित्य साधत घरेलु कामगार महिला उपचार घेत असलेल्या रूग्णालयांमध्ये आनंद सोहळा आयोजित केला होता. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काही रूग्णालयांना भेट दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, विवेकानंद हॉस्पिटल येथे डॉ. राम लाडे, होरायझन हॉस्पिटल येथे डॉ. श्रीनिकेतन काळे, टेके आय क्लिनिक येथे डॉ. रमाकांत टेके उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत घरेलु कामगार महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर 14 एप्रिल 2025 रोजी सांगलीमध्ये घेतले होते. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते होऊन, शिबिरामध्ये 2 हजार 880 महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 719 प्रकरणांमध्ये तात्काळ उपचार सुरू करणे आवश्यक होते. त्यांची वर्गवारी करून मागच्या पाच महिन्यापासून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार वेळोवेळी मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे संबंधित महिलांचे आजारही बरे झाले असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.

 या उपक्रमामध्ये आरोग्य विभागाने आणि कामगार विभागाने तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सहकार्य केले. जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आणि त्याचे फलित खूप चांगले आले आहे. हा सांगली पॅटर्न खऱ्या अर्थाने राज्यभर राबवला जावा, अशी भावना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी व्यक्त केली.

आनंद सोहळ्यामध्ये ज्या माता भगिनी बऱ्या झालेल्या आहेत, त्यांनी उपचाराबद्दल कृतज्ञता म्हणून डॉक्टरांना आपट्याची पानेरूपी सोने दिले. इतके दिवस आमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं होतं, मात्र डॉक्टरांनी, प्रशासनाने आमच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यामुळे आम्ही आज ठणठणीत झालो आहे. त्यासाठी या सगळ्या माता भगिनींनी आनंद व्यक्त केला.

या शिबिराच्या माध्यमातून उपचार झालेल्या माता भगिनींनी यावेळी आनंदाची भावना व्यक्त करत जिल्हा प्रशासन व उपचार केलेल्या डॉक्टरांबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. श्रीमती वंदना मुळे म्हणाल्या, घरेलु कामगार महिलांच्या आरोग्य तपासणीतून माझ्या डोळ्याचे मोतीबिंदुचे व डोळ्याच्या पडद्याचे खूप चांगले पूर्णपणे मोफत ऑपरेशन झाले आहे, कोणतीही तक्रार नाही. याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे, टेके आय क्लिनिकचे डॉ. रमाकांत टेके व त्यांच्या टीमचे आभार मानले.या शिबिरातून श्रीमती प्रियांका भोसले यांचे चोपडे हॉस्पिटल येथे अपेंडिक्सचे ऑपरेशन मोफत झाले आहे. याबद्दल त्यांनी शासनाचे व रूग्णालयाचे आभार मानले.

 श्रीमती रूपाली पाटील आणि श्रीमती शमा जामदार, शमशाद मुल्ला यांच्यावर आरोग्याच्या विविध तक्रारींबद्दल विवेकानंद हॉस्पिटल बामणोली येथे मोफत उपचार करण्यात आले. याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे व रूग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

00000

संबंधित पोस्ट

पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका.

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल –  1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन रिझर्व्हेशन करू शकणार नाहीत, नवीन नियम लागू

वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथोत्सव आवश्यक- इमाव कल्याण मंत्री सावे

अमरनाथ यात्रेला भक्तांचा जत्था रवाना..

नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकारी नियुक्तआमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश..

खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खतेआणि कर्ज उपलब्ध करा- पालकमंत्री शिरसाट