vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतक-यांनी डाउनलोड केले महाविस्तार AI अप कराड तालुका राज्यात प्रथम ३०,००० शेतक-यांनी केले ॲप डाउनलोड*

*जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतक-यांनी डाउनलोड केले महाविस्तार AI अप कराड तालुका राज्यात प्रथम ३०,००० शेतक-यांनी केले ॲप डाउनलोड*

 

सातारा प्रतिनिधी : शेती ही मानवाच्या जगण्याची मूलभूत गरज भागवणारी प्रक्रिया आहे. मात्र वाढती लोकसंख्या, हवामान बदल, पाण्याची कमतरता, आणि मातीचा -हास यामुळे पारंपरिक शेतीपद्धर्तीच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात नवनवीन संशोधनातून विकसित होणाऱ्या शेती तंत्रज्ञानाने कृषीक्रांतीचे नवे पर्व सुरु केले आहे हे तंत्रज्ञान केवळ उत्पादकता वाढवणारे नाही, तर पर्यावरणस्नेही, शाश्वत आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी देणारे ठरत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, आणि महाराष्ट्र हे शेतीसाठी देशातील आघाडीचे राज्य आहे पण शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने महाविस्तार AI हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अॅप लाँच केले आहे. 21 मे 2025 रोजी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन झाले. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अॅप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आणि आधुनिक शेती पाद्धर्तीवे मार्गदर्शन करते. महाविस्तार AI अॅप हे शेतीतील डिजिटल क्रांती ठरत आहे. MahaVISTAAR AI हे महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक अप आहे. महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापिठाच्या ज्ञानकोशाच्या समावेशाने व मराठी भाषेत उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे अप वापरणे अत्यंत सोपे आणि माहितीपूर्ण आहे. महाविस्तार ए.आय. अप शेतक-यामध्ये लोकप्रिय होत असून सातारा जिल्ह्यातिल १ लाख ४० हजार शेतक-यांनी हे अप डाउनलोड केलेले आहे. तर सातारा जिल्ह्यातील कराड तालुका हा ३०,००० डाउनलोड सह राज्यात अव्वल ठरलेला आहे.

महाविस्तार ए.आय.ॲप तालुका निहाय झालेले डाउनलोड पुढीलप्रमाणे – जावळी तालुका – 6 हजार 452,कराड तालुका- 30 हजार 860, खंडाळा तालुका- 6 हजार 265, खटाव तालुका – 15 हजार 281, कोरेगाव तालुका – 15 हजार 301, महाबळेश्वर तालुका – 1 हजार 611, माण तालुका – 13 हजार 331, पाटण तालुका – 8 हजार 864, फलटण तालुका -13 हजार 923 , सातारा तालुका – 17 हजार 884, वाई तालुका – 10 हजार 228, एकुण संख्या 1 लाख 40 हजार

महाविस्तार AI चे फायदे,रिअल-टाइम बाजारभाव माहिती मिळते अॅप स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव

रिअल टाइममध्ये दाखवते. शेतकरी त्यांच्या पिकांची योग्य वेळी आणि योग्य किंमतीला विक्री करू शकतात.

हवामान अंदाज आणि नियोजन जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे रिअल टाइम हवामान माहिती मिळते. पेरणी, कापणी, आणि खतांचा वापर यासाठी योग्य नियोजन करता येते. उदा, पावसाचा अंदाज असल्यास शेतकरी कापणी टाळू शकतात, ज्यामुळे नुकसान कमी होते. पिकांचे कीड रोगनिदान आणि उपाय अॅपमधील AI चॅटबॉट पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करते आणि उपाय सुचवते. शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करू शकतात. रोग आणि किडींचे वेळीच निदान झाल्याने उत्पादन वाचते आणि अनावश्यक कीटकनाशकांचा खर्च टाळला जातो. कृषी योजनां, माह डी. बी टी, आवजारे बँक, गोदाम सुविधा इत्यादि बाबतही माहिती मिळते. अॅपमध्ये कृषि विषयक माहितीपर विविध व्हिडिओ उपलब्ध आहेत. पिक लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती मिळते . अॅपमध्ये चॅटबॉट सुविधा देण्यात आलेले आहे याचा वापर करून कृषि विषयक विचारलेल्या प्रश्नाची तात्काळ उत्तरे मिळतात व ही माहिती voice असिस्टंट सुविधेद्वारे मराठीमध्ये वाचूनही दाखविले जाते. महाविस्तार A.I. अॅप गुगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहे. तसेच सोबतच्या क्यूआर कोड द्वारेही सहजरीत्या डाउनलोड करता येते. शेतक-यासाठी महाविस्तार A.I. अॅप अत्यंत उपयुक्त असल्याने जास्तीतजास्त शेतक-यांनी हे अॅप डाउनलोड करून त्याचा वापर करावा. या बाबत अधिक माहितीसाठी नजीकचे सहायक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी कीव मंडल कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार *– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नमुंमपा ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी व पालकांनी बनविलेल्या दिवाळी वस्तू व फराळ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद….

vishwatmaklokswamivarta

माननीय खासदार डॉ. कल्याण काळे यांची अन्नामृत फाउंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाकगृहास सदिच्छा भेट..

vishwatmaklokswamivarta

नवी दिल्ली प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

vishwatmaklokswamivarta