vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार *– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार *– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड प्रतिनिधी- नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध कोकणाचा जलदगतीने विकास व्हावा यासाठी रस्ते व महामार्ग उभारून प्रवासाचा वेग कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहॆ. प्रवासाचा वेग कमी करण्याची गरज लक्षात घेऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करणे, मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता बरोबरच अनेक रस्त्यांची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कुल माणगाव च्या नवीन इमारतीचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री भरत गोगावले, खा. सुनील तटकरे, आ. महेंद्र दळवी, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, माणगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड राजीव साबळे, संचालक अनिकेत तटकरे यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कोकणातील विकासाला गती देण्यासाठी येथील प्रवासाचा कालावधी कमी करण्याची गरज आहॆ. यासाठी राज्य शासनाने

कोस्टल महामार्गावरील ९ खाडी पुलांचे काम सुरू केले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई गोवा महामार्ग वर माणगाव येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माणगाव बायपासचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. कोकणातील लोकांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठे प्रकल्प या ठिकाणी उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासन अनेक लोकांभिमुख प्रकल्प राबवून विकासाला चालना देत असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले.

राज्य शासनामार्फत महिला सक्षमकरणासाठी सुरु करण्यात आलेली लाडकी बहीण योजना किती ही अडचणी आल्या तरी बंद करण्यात येणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84 हजारहून अधिक अर्ज – भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद…

जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण राज्य पथकाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन..

उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

महसुल खात्याचे क्रांतीकारी निर्णय जिल्हास्तरावर त्वरीत राबविण्यात यावे.. महसुलमंत्री तथा पालकमंत्री अमरावती श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.

शेगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर