vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे – पालकमंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे – पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

सोलापूर प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची बँक आहे. ही बँक नेहमी यशाच्या दिशेने वाटचाल करत राहावी. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ दिले तरच शेतकरी उभा राहील. त्यामुळे मध्यवर्ती बँक नेहमी नफ्यात असली पाहिजे आणि तिच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक सहकारी पतसंस्थेच्या ९१ व्या सर्वसाधारण सभेत व आमदार राजेंद्र राऊत यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी आमदार राऊत यांचा पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि जिल्हा दूध संघ सुरू करण्याबाबत शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले. बँक कर्मचारी सहकारी संस्थांनी स्वतः विश्वस्ताप्रमाणे काम केले तर या संस्था प्रगतीच्या शिखरावर जातील, असे ते म्हणाले. मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या प्रगतीची आधारस्तंभ असून बँकेने शेतकऱ्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यांना कृषी कर्ज त्वरित उपलब्ध होईल, या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

आमदार राजेंद्र राऊत हे एक धडाडीचे कार्यकर्ते असून ते समाजसेवेसाठी नेहमी आग्रही असतात. सामान्य माणसाचे प्रश्न ते तळमळीने जाणतात आणि त्यासाठी धावून जातात, असे गौरवोद्गार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, माजी आमदार राम सातपुते, नगरसेविका रोहिणीताई तडवळकर, दिलीप कोल्हे यांच्यासह अधिकारी, बँक कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्रीरंग सातपुते यांनी केले.

000

 

संबंधित पोस्ट

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची ग्वाही• शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास शासन कटिबद्ध• सोनखेड व लोहा येथे पीक परिस्थितीची केली पाहणी• पिण्याचे पाणी, चारा व शिक्षणासाठीही मदत देणार

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि केंद्रशासित प्रदेश शासन (दुरुस्ती) विधेयक २०२५ या महत्त्वपूर्ण विधेयकांवर सखोल चर्चा आणि व्यापक सल्लामसलत सुरू केल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा अपराजिता सारंगी

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ-समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यात तीन महिन्यात 90.77 कोटींची वसुली…

vishwatmaklokswamivarta

सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध शासकीय योजनांचीजालना जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा- अध्यक्ष शेरसिंग डागोर 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ अर्ज माघारीनंतर आता ४१ उमेदवार रिंगणात

vishwatmaklokswamivarta