vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

 

सांगली, प्रतिनिधी: इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु झालेली आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे एक व मुलींसाठी 50 विद्यार्थिनी क्षमतेचे एक अशी दोन वसतिगृहे शासनाकडून सुरू करण्यात आलेली असून या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया दि. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. अशा 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात प्रवेश मिळण्याकरिता https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. त्या अर्जाची प्रत व त्याअनुषंगिक सर्व कागदपत्रे (सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली) या कार्यालयास दि. 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत जमा करावीत. अधिक माहितीसाठी मुलांचे वसतिगृहासाठी अधीक्षक मोबा. क्र.9763491019 व मुलींच्या वसतिगृहासाठी अधीक्षिका मोबा. क्र. 8766954163 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा१२० रुग्णवाहिकेद्वारे, ८६४३ वारकऱ्यांची आरोग्यसेवा..

शांताई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्य वाटप

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करावीत