vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

बुलढाणा प्रतिनिधी): केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार व निर्देशांकांच्या आधारे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे राज्यस्तरावरून करण्यात आलेल्या मुल्यांकनात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यातील अव्वल पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवले आहे. सदर मुल्यांकन १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामगिरीवर आधारित होते.या यशामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपसंचालक (आरोग्य सेवा) अकोला मंडळ डॉ. सुशिल वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे यांनी प्रभावी कामगिरी बजावली.

दरम्यान, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. वर्षा श्रीधर गुट्टे यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्याच्या या यशामुळे क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने बुलढाणा जिल्हा ठोस पावले टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जनगणना 2027 अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट दिल्ली येथील पथकाकडून जालना जिल्ह्यातील जनगणनेच्या कामकाजाचे कौतुक….

रायगड जिल्हा सरासरी पाऊस (तालुकानिहाय पर्जन्यमान) दि. ०८.०६.२०२५ (मिमीमध्ये)

राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे पोषण आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांसाठी नवीन हेल्पलाइन क्रमांक 1515 हा नवीन हेल्पलाइन क्रमांक 1 नोव्हेंबर, 2025 पासून होणार सुरू

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी